अतिप्रसंग करणाऱ्या आरोपीला बदडले
By Admin | Updated: February 6, 2015 22:35 IST2015-02-06T22:35:24+5:302015-02-06T22:35:24+5:30
महिलेचा विनयभंग : शेजाऱ्याच्या घरावर दगडफेक

अतिप्रसंग करणाऱ्या आरोपीला बदडले
म िलेचा विनयभंग : शेजाऱ्याच्या घरावर दगडफेकनागपूर : घरात शिरून महिलेवर अतिप्रसंग करणाऱ्या आरोपीला जमावाने बदडले. त्यामुळे या आरोपीने नंतर शेजारच्या व्यक्तीच्या घरावर दगडफेक केली. या प्रकारामुळे हुडकेश्वरमध्ये गुरुवारी सायंकाळी वातावरण संतप्त झाले होते. लंकेश नारायण कन्नाके (वय ४०, रा. हुडकेश्वर) असे आरोपीचे नाव आहे. गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजता हुडकेश्वरमधील एका महिलेच्या (वय ३५) घरात शिरून कन्नाकेने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. महिलेने प्रतिकार करून मदतीसाठी आरडाओरड केली. त्यामुळे आजूबाजूची मंडळी धावून आली. त्यांनी कन्नाकेला पकडून चोप दिला. परिणामी कन्नाकेने गणेश येवले यांच्या घरावर दगडफेक केली. त्यांचे दारही तोडले. या घटनेमुळे वातावरण संतप्त झाले. माहिती मिळाल्यानंतर हुडकेश्वर पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी आरोपी कन्नाकेला अटक केली. --------