मल्ल्याच्या प्रत्यार्पणास ब्रिटनकडून होकार
By Admin | Updated: March 24, 2017 23:57 IST2017-03-24T23:57:36+5:302017-03-24T23:57:36+5:30
किंगफिशर एअरलाइन्स या स्वत:च्या विमान कंपनीच्या नावे घेतलेली हजारो कोटी रुपयांची कर्जे बुडवून देशातून परागंदा झालेला

मल्ल्याच्या प्रत्यार्पणास ब्रिटनकडून होकार
नवी दिल्ली : किंगफिशर एअरलाइन्स या स्वत:च्या विमान कंपनीच्या नावे घेतलेली हजारो कोटी रुपयांची कर्जे बुडवून देशातून परागंदा झालेला ‘मद्यसम्राट’ उद्योगपती विजय मल्ल्या याचे भारतात प्रत्यार्पण करण्यास ब्रिटन सरकार राजी झाले असून, त्यासाठीचे अधिकृत वॉरन्ट लवकरच काढले जाईल, अशी अपेक्षा आहे.
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते गोपाळ बागले यांनी शुक्रवारी सांगितले की, मल्ल्या यांचे प्रत्यार्पण (भारतात परत पाठविणे) करण्याची भारताची विनंती ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी फेब्रुवारीत मंजूर केली आहे. आता ते प्रकरण वॉरन्ट काढण्यासाठी वेस्टमिन्सटर दंडाधिकारी न्यायालयाकडे पाठविले गेले आाहे, असे भारताला कळविण्यातआले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)