शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

देशाचा जीडीपी दर 7.3 टक्के राहील, वर्ल्ड बँकेचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2019 10:30 IST

आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये भारत जगभरात सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक देश असेल, असे वर्ल्ड बँकनं जाहीर केलेल्या अहवालामध्ये मांडण्यात आले आहे. मंगळवारी (8 जानेवारी) वर्ल्ड बँकेकडून यासंबंधीचा अहवाल जारी करण्यात आला.

ठळक मुद्दे2018-19 दरम्यान भारताचा जीडीपी दर 7.3% चीनचा विकासदर 6.3% राहील - वर्ल्ड बँक

नवी दिल्ली - आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये भारत, जगभरात सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक देश असेल, असे वर्ल्ड बँकनं जाहीर केलेल्या अहवालामध्ये मांडण्यात आले आहे. मंगळवारी (8 जानेवारी) वर्ल्ड बँकेकडून यासंबंधीचा अहवाल जारी करण्यात आला. या अहवालानुसार, सुरू असलेल्या आर्थिक वर्षादरम्यान (2018-19) भारताचा जीडीपी 7.3% दरानं वाढेल. भारताच्या तुलनेत चीनचा विकास दर 6.3% राहील, अशी आशा वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, 2018मध्ये चीनचा जीडीपी दर 6.5 टक्के एवढा होता. 

वर्ल्ड बँक प्रॉस्पेक्ट्स ग्रुपचे संचालक अहान कोसे यांनी एका मुलाखतीत म्हटले की,''गुंतवणुकीतील वाढ आणि वाढत्या खपामुळे आम्हाला आशा आहे की आर्थिक वर्ष 2018-2019मध्ये भारताचा जीडीपी दर 7.3 टक्के एवढा राहील. तर 2019 आणि 2020 वर्षात यामध्ये वाढ होऊन जीडीपी दर 7.5 टक्क्यांपर्यंत पोहोचेल. व्यवसायाच्या क्रमवारीत भारतानं वेगवान प्रगतीची नोंदणी केली आहे. भारत देश म्हणजे सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था आहे''. 

आगामी लोकसभा निवडणूक पाहता वर्ल्ड बँकेने सादर केलेला अहवाल म्हणजे मोदी सरकारसाठी आनंद देणारे वृत्त असल्याचे म्हटले जात आहे. 

यंदाच्या आर्थिक वर्षात (2018-19) बहुतेक देशांच्या अर्थव्यवस्थेचा वेग तुलनेनं मंदावणार आहे, असेही 'ग्लोबल इकोनॉमिक प्रॉस्पेक्ट्स : डार्कनिंग स्कायज'च्या अहवालात सांगण्यात आले आहे. तर दुसरीकडे, मोदी सरकारच्या जीएसटी लागू करण्याच्या निर्णयाचे वर्ल्ड बँकेकडून कौतुक करण्यात आले आहे. भारतात जीएसटी आणि नोटाबंदी लागू करण्याच्या निर्णयानं अनधिकृत क्षेत्रांना अधिकृत क्षेत्रांमध्ये बदलण्याचे काम केले आहे, असेही अहवालात म्हटले गेले आहे.   

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत