शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
3
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
4
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
5
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
6
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
7
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
8
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
11
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
12
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
13
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
14
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
15
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
16
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
17
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
18
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
19
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
20
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!

पाकिस्तानी कायद्यानुसारच चालेल खटला

By admin | Updated: May 21, 2017 01:07 IST

कुलभूषण जाधव यांचा खटला पाकिस्तानी कायद्यानुसारच चालवून तार्किक निष्कर्षाप्रत नेला जाईल, असे प्रतिपादन पाकिस्तानचे गृहमंत्री चौधरी निसार अली खान यांनी केले.

इस्लामाबाद : कुलभूषण जाधव यांचा खटला पाकिस्तानी कायद्यानुसारच चालवून तार्किक निष्कर्षाप्रत नेला जाईल, असे प्रतिपादन पाकिस्तानचे गृहमंत्री चौधरी निसार अली खान यांनी केले.हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिली आहे. या पार्श्वभूमीवर चौधरी यांचे वक्तव्य आले आहे. ‘फ्रंटियर कॉर्प’च्या पासिंग आऊट परेडनिमित्त खान यांनी म्हटले की, पाकिस्तानात अराजकता आणि अशांती पसरविण्यासाठी काही लोक आमच्या शत्रूकडून पैसे घेत आहेत. जाधव हा एक भारतीय हेर आहे. तो पाकिस्तानविरोधातील काही गंभीर गुन्ह्यांत सामील होता. त्याला देशाच्या कायद्याने दोषी ठरविले आहे. याच कायद्यान्वये आणि देशाच्या घटनेच्या आधारे त्याचा खटला तार्किक निष्कर्षाप्रत नेला जाईल.दरम्यान, जाधव यांच्या फाशीला स्थगिती मिळवून भारताने पाकिस्तानला धोबीपछाड दिल्यामुळे पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय न्यायालयातील युक्तिवादासाठी आपला वकील बदलला आहे. पाकिस्तानचे अ‍ॅटर्नी जनरल अश्तर औसफ अली हे आता पाकिस्तानच्या वतीने बाजू मांडतील. या आधी ही जबाबदारी ब्रिटनस्थित वकील खवार कुरेशी यांच्याकडे होती.नवाज शरीफ यांचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार सरताज अजीज यांनी म्हटले की, आंतरराष्ट्रीय न्यायालयात पाकिस्तान हरला, असे म्हणणे चूक आहे. न्यायालयाने जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिली असली तरी त्यांना दूतावासाचा संपर्क देण्याची भारताची मागणी मान्य केलेली नाही. या खटल्यासाठी पाकिस्तान आणखी मजबूत टीम पाठविल.(वृत्तसंस्था)जाधव हे कसाबपेक्षा खतरनाक -मुशर्रफ- कुलभूषण जाधव हे मुंबई हल्ल्यातील अतिरेकी अजमल कसाब याच्यापेक्षाही खतरनाक आहेत, असे वक्तव्य पाकचे माजी लष्करशहा जनरल परवेज मुशर्रफ यांनी केले आहे.- मुशर्रफ म्हणाले की, ‘‘जाधव यांनी हेरगिरी करून कसाबपेक्षा जास्त बळी घेतलेले असू शकतात. जाधव हे दहशतवाद भडकावण्याचे काम करत होते.- मुशर्रफ यांच्या वक्तव्यामुळे भारतीयांनी समाजमाध्यमांतून त्यांच्यावर हल्ला चढविला आहे.