अकस्मात मृत्यू / आत्महत्या

By Admin | Updated: February 6, 2015 22:35 IST2015-02-06T22:35:24+5:302015-02-06T22:35:24+5:30

इमामवाड्यात तरुणाने विष घेतले

Accidental Death / Suicide | अकस्मात मृत्यू / आत्महत्या

अकस्मात मृत्यू / आत्महत्या

णे : महिला महोत्सवांतर्गत सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त काढलेल्या रॅलीसाठी ठेकेदाराने निकृष्ट दर्जाच्या टोप्या पुरविल्या. ऑर्डर २ हजार नगांची असताना प्रत्यक्षात कमी टोप्या देण्यात आला त्याचे बिल मात्र पूर्ण देण्यात आल्याचे उजेडात आले आहे. प्रशासनाकडून याची गंभीर दखल घेण्यात आली असून त्याची तपासणी करण्यात येत आहे.
महापालिकेकडून ३ जानेवारी ते ८ मार्च या कालावधीमध्ये महिला महोत्सव साजरा केला जात आहे. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ३ जानेवारी रोजी भिडेवाडा ते सावित्रीबाई फुले स्मारक अशी रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये शालेय विद्यार्थ्यांसह अन्य सामाजिक संघटनांना सहभागी करुन घेण्यात आले होते. त्यांच्यासाठी टोप्या, झेंडे आणि अन्य साहित्याची खरेदी ठेकेदारामार्फत करण्यात आली. तातडीने हे साहित्य हवे असल्याने मुंबईच्या ठेकेदाराकडून ४२ रूपये दराने टोप्यांची खरेदी करण्यात आली. ठेकेदाराने पांढर्‍या रंगाच्या टोपीवर दोन्ही बाजूला महापालिकेचा लोगो व समोरच्या बाजूस कार्यक्रमाचा लोगो टाकावे असे सांगण्यात आले होते. मात्र ठेकेदाराने प्रत्यक्षात एका बाजूला फक्त महापालिकेचा लोगो टाकून टोप्या पुरविल्या. लोगो हा चार रंगाचा असावा असे ठरले असताना केवळ एकाच रंगात लोगो तयार करण्यात आला. ठरल्याप्रमाणे २ हजार नग टोप्या न देता त्या अपुर्‍या देण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.
महापालिकेकडून तातडीने साहित्य खरेदी केली गेल्यामुळे त्याच्या खरेदीसाठी योग्य ती प्रक्रिया अवलंबता आली नाही. पालिकेचे नुकसान होऊ नये याकरिता अशा कार्यक्रमांचे नियोजन लवकर होऊन त्यानंतरच त्याची अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

चौकट
'ठेकेदाराने दिलेल्या टोप्यांची संख्या, त्याचा दर्जा व आकारलेली किंमत या सगळयांची तपासणी भांडार विभागाकडून केली जाणार आहे. त्यानंतरच त्यांना बिलाचे वाटप केले जाईल. महिला महोत्सवासाठी तातडीने साहित्य हवे असल्याने कोटेशन मागवून ही खरेदी करण्यात आली होती.'
श्रीनिवास कंदूल, भांडार विभाग प्रमुख महापालिका

Web Title: Accidental Death / Suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.