एनसीसी कर्मचाऱ्यासह दोघांचा अपघाती मृत्यू

By Admin | Updated: February 13, 2015 00:38 IST2015-02-13T00:38:28+5:302015-02-13T00:38:28+5:30

नागपूर : राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) कर्मचाऱ्यासह दोघांचा अपघाती मृत्यू झाला. सिव्हील लाईन आणि एमआयडीसीत हे अपघात घडले.

Accidental death of both with NCC employee | एनसीसी कर्मचाऱ्यासह दोघांचा अपघाती मृत्यू

एनसीसी कर्मचाऱ्यासह दोघांचा अपघाती मृत्यू

गपूर : राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) कर्मचाऱ्यासह दोघांचा अपघाती मृत्यू झाला. सिव्हील लाईन आणि एमआयडीसीत हे अपघात घडले.
राजेंद्र खोडके (वय ४५, रा. मानेवाडा) हे एनसीसीमध्ये कर्मचारी आहेत. आज सायंकाळी ५.१५ च्या सुमारास ते कार्यालयातून आपल्या स्कुटरने घराकडे निघाले. त्यांना पंचायत समितीच्या बाजूला भरधाव ट्रकने जोरदार धडक मारली. डोक्याच्या भारावर पडलेल्या खोडके यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे घटनास्थळी मोठी गर्दी जमली. माहिती कळताच सीताबर्डी पोलीस पोहचले. त्यांनी ट्रकचालकावर गुन्हा दाखल केला.
अशाच प्रकारे एमआयडीसीतील द्वारकाप्रसाद ताम्रकर (वय ६५) ८ फेेब्रुवारीला सकाळी हिंगणा मार्गावर फिरत होते. त्यांना दुचाकीचालकाने जोरदार धडक मारली. गंभीर जखमी झालेल्या ताम्रकर यांचा आज पहाटे ३.३० च्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Web Title: Accidental death of both with NCC employee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.