एक्स्प्रेस-वेवर कारला अपघात (मुख्य अंकासाठी)
By Admin | Updated: December 20, 2015 23:56 IST2015-12-20T23:56:16+5:302015-12-20T23:56:16+5:30
माडपजवळ घडली घटना : दोन महिलांसह तीन महिन्यांच्या बालकाचा मृत्यू

एक्स्प्रेस-वेवर कारला अपघात (मुख्य अंकासाठी)
म डपजवळ घडली घटना : दोन महिलांसह तीन महिन्यांच्या बालकाचा मृत्यू खालापूर : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत माडपजवळ रविवारी दुपारी आय-२० कारला झालेल्या भीषण अपघातात दोन महिलांसह तीन महिन्याच्या बालकाचा मृत्यू झाला. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून गुजरात राज्यातील सुरतमधील हे कुटुंब फिरण्यासाठी महाराष्ट्रात आले होते. पुण्यावरून मुंबईला जात असताना चालकाचे भरधाव वेगातील कारवरील नियंत्रण सुटल्याने कार डाव्या बाजूला जावून झाडावर आदळली. या अपघातातील जखमींवर कळंबोली येथील एम.जी.एम. रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृतीही चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले. सुरत येथे राहणारे प्रणव पटेल (३२) आपल्या कुटुंबासह महाराष्ट्रात फिरण्यासाठी आले होते. पुणे येथून पटेल आपल्या कुटुंबासह जी.जे. ०५ जे.डी. ४२५१ या क्र मांकाच्या आय-२० कारने मुंबईकडे जात असताना खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत माडप व कुंभिवली गावाच्या दरम्यान भरधाव वेगातील कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार डाव्या बाजूला असलेल्या झाडावर जावून धडकली. यामध्ये अंजू पटेल (३२), दिना सिंग (४३) या दोन महिला जागेवरच ठार झाल्या तर या अपघातात पूर्व पटेल या तीन महिन्याच्या बालकाचाही मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये प्रणव पटेल व मनीष जयंतीलाल (३२) हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृतीही चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या अपघाताची नोंद खालापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस निरीक्षक विकास रामुगडे पुढील तपास करीत आहेत.(वार्ताहर)फोटो २० खालापूर ऑक्सीडेंट