शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

Accident: भीषण अपघात, भरधाव इनोव्हाने ९ जणांना चिरडले, ५ जण मृत्युमुखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 13:35 IST

Accident: कालका-सिमला राष्ट्रीय महामार्गावर एका भरधाव इनोव्हा कारने पादचाऱ्यांना चिरडले.या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

हिमाचल प्रदेशमधील सोलन जिल्ह्यातील आज सकाळी एक भीषण अपघात झाला. येथील धर्मपूरमध्ये कालका-सिमला राष्ट्रीय महामार्गावर एका भरधाव इनोव्हा कारने पादचाऱ्यांना चिरडले.या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जणांना पीजीआयमध्ये अधिक उपचारांसाठी पाठवण्यात आले आहे. तर अन्य दोन जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस या अपघाताबाबत अधिक तपास करत आहेत.

प्राथमिक माहितीनुसार कालका-सिमला महामार्गावर धर्मपूर येथील ही घटना आहे. मंगळवारी १० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. एक इनोव्हा भरधाव वेगाने सिमलाच्या   दिशेने येत होती. यादरम्यान, वळणावर वाहनचालकाचं नियंत्रण सुटलं. त्यानंतर या कारने तिथून जात असलेल्या पादचाऱ्यांना चिरडले.

या भीषण अपघातात पाच जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर इतर चार जणांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथून दोन गंभीर जखमींना चंडीगड येथील पीजीआयमध्ये अधिक उपचारांसाठी पाठवण्यात आले आहे. स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. तसेच मृत आणि जखमींची ओळख पटली आहे.

आज सकाळी सोलन येथील धर्मपूरमधील  सुक्की जोहडी येथे काही लोक पायी जात होते‌. अपघाताची शिकार झालेले सर्व जण प्रवासी मजूर असून ते उत्तर प्रदेशमधील कुशीनगर आणि बिहारमधील छपरा येथील रहिवासी आहेत. मृतांची ओळख गुड्डू यादव, राजा वर्मा, निप्पू निसाद आणि मोतीलाल यादव आणि सन्नी देवल अशी पटली आहे.

टॅग्स :AccidentअपघातHimachal Pradeshहिमाचल प्रदेश