ग्रामीण पोलिसांच्या वाहनास अपघात
By Admin | Updated: May 26, 2016 00:02 IST2016-05-25T22:59:35+5:302016-05-26T00:02:35+5:30
नाशिक : तालुका पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालणार्या ग्रामीण पोलिसांच्या वाहनास अपघात झाल्याची घटना मंगळवारी (दि़ २४) मध्यरात्री गंगापूररोडवरील हॉटेल निसर्गजवळ घडली़ सुदैवाने या अपघातात जीवितहानी झालेली नाही़ याबाबत अधिक माहिती अशी की, ग्रामीण पोलीस दलातील रमेश माळी हे आपल्या कर्मचार्यांसह पोलीस वाहनातून (एमएच १५, इए २००३) गस्त घालीत होते़ त्यावेळी समोरून येणार्या वाहनाच्या प्रखर लाइटमुळे वाहनचालकाचे नियंत्रण सुटले व पोलीस वाहन झाडावर जाऊन आदळले़ या अपघाताची गंगापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)