मध्य प्रदेशातील सिधी येथे, मैहर मंदिरात 'मुंडण' समारंभासाठी जाणाऱ्या भाविकांनी भरलेल्या एका वाहनाची समोरुन येणाऱ्या टँकरला धडक झाली. या भीषण अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला तर १४ जण जखमी झाले. या जखमींपैकी ९ जण गंभीर जखमी असल्याचे सांगितले जात आहे.
भाविकांच्या गाडीत २२ लोक होते. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या ९ जणांना रेवा येथील संजय गांधी रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. तर पाच जणांवर सिधी येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना बहरी रोडवरील उपनी गावाजवळ घडली.
भरधाव क्रूझरचा टायर फुटून समृद्ध महामार्गावर भीषण अपघात
समृद्धी महामार्गावरअपघातांचे सत्र सुरूच असून, ८ मार्च रोजी सकाळी ८ वाजता सिंदखेडराजा परिसरात भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत क्रूझर वाहनातील दोघांचा मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले.
यवतमाळ जिल्ह्यातील आसेगाव देवी येथील भाविक शिर्डी दर्शनासाठी निघाले असताना त्यांचा क्रूझर (एमएच-२५आर-३५७९) वाहनाचा टायर फुटला. वाहन वेगात असल्याने ते सुरक्षा कठड्याला धडकून पलटी झाले. या अपघातानंतर मागून येणाऱ्या दुसऱ्या एका कारचे (एमएच-२९-सीबी-९६३०) नियंत्रण सुटल्याने ती देखील क्रूझरवर आदळली.