अमळनेर डेपोच्या इंदौर बसला प्रितमपूरमध्ये अपघात
By Admin | Updated: July 20, 2016 11:26 IST2016-07-20T11:26:24+5:302016-07-20T11:26:24+5:30
अमळनेर ते इंदोर बसचा मंगळवारी दुपारी ४ ते ४.३० दरम्यान मध्यप्रदेशातील प्रितमपूर शहराजवळ अपघात झाला.

अमळनेर डेपोच्या इंदौर बसला प्रितमपूरमध्ये अपघात
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
प्रितमपूर , दि. २० - अमळनेर ते इंदोर बसचा मंगळवारी दुपारी ४ ते ४.३० दरम्यान मध्यप्रदेशातील प्रितमपूर शहराजवळ अपघात झाला. यात एक ६७ वर्षीय वृद्ध महिला जागीच ठार झाली. तर चालक गंभीर जखमी झाला. वाहक किरकोळ जखमी झाल्याचे वृत्त आहे.
१९ जुलै रोजी अमळनेर आगारातून MH-20-BL-2533 अमळनेर इंदोर हि बस नेहमी प्रमाणे सकाळी प्रवासी घेऊन निघाली तिचा दुपारी ४ ते ४.३० दरम्यान प्रितमपूर शहराजवळ कंटेनरने समोर धडक दिल्याने एका ६७ वर्षीय वृद्धेचा जागीच मृत्यू झाला असून चालक व्ही.एन.पाटील ( रा.निंब ता.अमळनेर ) हे गंभीर जखमी झाले.
त्यांना तेथील खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात ठेवले आहे तर वाहक डी.पी.चव्हाण ( रा.मांडळ ता.अमळनेर ) हे किरकोळ जखमी झाले आहेत मात्र मयत वृद्धेची अद्याप ओळख पटलेली नाही अशी माहिती आगार प्रमुख सैंदाणे यांनी सांगितले.