शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Video - धक्कादायक! ड्रायव्हरला हार्ट अटॅक, शोभायात्रेत घुसली बोलेरो; दोघांचा मृत्यू, अनेक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2024 15:25 IST

एका अनियंत्रित बोलेरोने शोभायात्रेत घुसून दहा-बारा लोकांना चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

राजस्थानमधील नागौर येथील डेगाना येथे विश्वकर्मा जयंतीदरम्यान एक मोठी दुर्घटना घडली. एका अनियंत्रित बोलेरोने शोभायात्रेत घुसून दहा-बारा लोकांना चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यापैकी 2 जणांचा मृत्यू झाला आहे आणि इतर जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर काहींना अजमेरला रेफर करण्यात आले आहे. 

काही जखमींवर डेगाना येथे उपचार सुरू आहेत. बाजारात शोभायात्रा निघाली तेव्हा लहान मुलं आणि महिलांनी मोठी गर्दी केली होती. सर्वच जण आनंदाने सहभागी झाले होते. मात्र या दुर्घटनेनंतर रुग्णालयात आता मोठी गर्दी झाली आहे. बोलेरो चालकाला हार्ट अटॅक आला, त्यानंतर त्याचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि बोलेरो लोकांना चिरडत पुढे निघून गेली. 

भयंकर घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे, ज्यामध्ये बोलेरो कशी अचानक शोभायात्रेत घुसते आणि लोकांना चिरडून पुढे जाते हे दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. बोलेरो चालक सुरुवातीला शोभायात्रेच्या मागे हळूहळू चालत होता, मात्र अचानक बोलेरो गाडीचा वेग वाढतो.

गाडीचा वेग वाढल्याने ती लोकांना चिरडत पुढे सरकत असल्याचं फुटेजमध्ये दिसत आहे. यानंतर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं  बोलेरो चालकाला हार्ट अटॅक आला, त्यानंतर तो बेशुद्ध झाला आणि वाहनावरील नियंत्रण सुटलं. या दुर्घटनेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ही घटना घडली तेव्हा रस्त्यावर देखील लोकांची वर्दळ पाहायला मिळत आहे.  

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाRajasthanराजस्थान