सिक्कीममधील जुलूक येथे सुमारे १२ हजार फूट उंचीवर असलेल्या पर्वतरांगात आज एक भीषण रस्ते अपघात झाला. या आपघातात सापडलेल्या निमलष्करी दलाच्या जवानांना आणि जखमी प्रवाशांना वाचवण्यासाठी भारतीय हवाई दलाने तातडीने बचाव मोहीम हाती घेतली. तसेच निमलष्करी दलाच्या सुमारे १२ जवानांना सुखरूप वाचवले.
पूर्व एअर कमांडचे चीता हेलिकॉप्टर जुलूक हेलिपॅडवरून आणि गंगटोक येथून एमआय-१७ हेलिकॉप्टर्स मदतकार्यात गुंतली आहेत. अपघातात जखमी झालेल्या जवानांना बागडोगरा येथील बेंगडुबी लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहेत. दरम्यान, या दुर्घटनेबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही. तसेच हा अपघात का घडला, याचंही कारण समोर आलेलं नाही.