शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 19:04 IST

विमानात प्रवाशांना एसीशिवाय गरमीमध्ये बसावं लागलं. प्रवाशांमध्ये लहान मुलं आणि वृद्ध होते. उकाड्यामुळे त्यापैकी अनेकांची प्रकृती बिघडली.

अहमदाबाद विमान अपघातानंतर आता दुबईहून जयपूरला येणारं एअर इंडियाचं विमान ५ तास उशिराने उड्डाण करत असल्याची माहिती समोर आली आहे. तांत्रिक बिघाडामुळे उड्डाणात हा विलंब झाला. मात्र या संपूर्ण प्रकरणातील सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे दुबई विमानतळावर विमानात प्रवाशांना एसीशिवाय गरमीमध्ये बसावं लागलं. प्रवाशांमध्ये लहान मुलं आणि वृद्ध होते. उकाड्यामुळे त्यापैकी अनेकांची प्रकृती बिघडली.

सोशल मीडियावर याचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. विमानातील एका प्रवाशाच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये असं म्हटलं आहे की, दुबईहून जयपूरला येणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाईट IX १९६ मधील प्रवाशांना पाच तास एसीशिवाय बसून ठेवण्यात आलं होतं. या काळात विमानात उपस्थित असलेल्या वृद्ध आणि मुलांची तब्येत बिघडली. ही घटना १३ जूनच्या रात्री घडली आहे.

मुलं रडू लागली, वृद्धांची तब्येत बिघडली

दुबईहून जयपूरला येणारी एअर इंडिया एक्सप्रेसची इंटरनॅशनल फ्लाईट IX १९६  ७:२५ वाजता दुबईहून निघणार होतं, परंतु तांत्रिक बिघाडामुळे त्याचं उड्डाण अनेक तास उशिरा झालं. अखेर विमान १२:४५ वाजता दुबईहून जयपूरला निघालं, परंतु त्यापूर्वी प्रवाशांना सुमारे ५ तास एसीशिवाय विमानात बसवून ठेवण्यात आलं. या काळात विमानात प्रचंड उष्णता होती आणि त्यामुळे वृद्ध आणि लहान मुलांची प्रकृती बिघडली.

प्रवाशांनी केले गंभीर आरोप 

प्रवाशांनी एअरलाईन्सवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी आरोप केला आहे की, या काळात त्यांना साधं पाणीही देण्यात आलं नाही किंवा उशीर होत असल्याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आली नाही.

प्रवाशांनी सांगितलं की, आम्ही ५ तास पंखा आणि एसीशिवाय भीषण गरमीमध्ये विमानात बसलो होतो. याच दरम्यान मुलं रडत होती आणि वृद्धांना श्वास घेण्यास त्रास होत होता. ही बाब आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये विमानातील लोक गरमीमुळे हैराण झाल्याचं पाहायला मिळत आहे. ते पेपरने वारा घालताना दिसत आहेत. 

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाDubaiदुबई