शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

लवकरच बाजारात येणार एसी हेल्मेट! तेलंगणच्या ३ तरुणांचे स्टार्ट अप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 11:38 PM

तेलंगणमधील तीन तरुण यांत्रिकी अभियंत्यांनी सुरु केलेल्या स्टार्ट-अपला यश आले तर ज्यातून उन्हाळ्यात थंड व थंडीत उबदार हवेचा झोत डोक्यावर येईल असे दुचाकीस्वारांनी वापरायचे एसी हेल्मेट लवकरच बाजारात उपलब्ध होईल.

हैदराबाद : तेलंगणमधील तीन तरुण यांत्रिकी अभियंत्यांनी सुरु केलेल्या स्टार्ट-अपला यश आले तर ज्यातून उन्हाळ्यात थंड व थंडीत उबदार हवेचा झोत डोक्यावर येईल असे दुचाकीस्वारांनी वापरायचे एसी हेल्मेट लवकरच बाजारात उपलब्ध होईल.   कौस्तुभ कौंडिन्य, श्रीकांत कोम्मुला आणि आनंद कुमार या प्रत्येकी २२ वर्षांच्या अभियंत्यांनी यासाठी लागणारे तंत्रज्ञान विकसित केले असून त्याआधारे हेल्मेटचे उत्पादन करणारे ‘जर्श’ नावाचे स्टार्ट-अप सुरु केले आहे. हे तिघेही दोन वर्षांपूर्वी यांत्रिकी अभियांत्रिकीचे पदवीधर झाले. ‘जर्श’ हे ‘जस्ट ए रादर व्हेरी सेफ हेल्मेट’ या सविस्तर इंग्रजी नावाचे संक्षिप्त रूप असून त्याचा अर्थ अत्यंत सुरक्षित हेल्मेट असा होतो.कौस्तुभ कौंडिल्य या स्टार्ट-अपचा सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. त्याने सांगितले की, या तंत्रज्ञानावर आधारित उन्हाळ््यात डोके थंड ठेवणारे व थंडीत डोके उबदार ठेवणारे औद्योगिक कारखान्यात वापरायचे हेल्मेट आम्ही विकसित केले असून आता तशाच प्रकारचे दुचाकीस्वारांना वापरता येईल, अशा हेल्मेटवर आम्ही काम करत आहोत. त्यांच्या या स्टार्ट-अपला तेलंगण सरकारचे पाठबळही लाभले आहे.या औद्योगिक हेल्मेटचे उत्पादन करण्यासाठी तेलंगणात मेडचाल येथे उभारण्यात येणाºया कारखान्यात मार्चअखेर उत्पादन सुरु होईल, असे कौस्तुभने सांगितले. दरमहा एक हजार हेल्नेट उत्पादनाची या कारखान्याची क्षमता असेल.अशा काही हेल्मेटची चाचणी व परीक्षणासाठी विक्री करण्यात आली असून भारतीय नौदलाने नौदल गोद्यांमधील कामगारांसाठी व टाटा मोटर्सने त्यांच्या लखनऊ कारखान्याती कामगारांसाठी अशी हेल्मेट घेतली आहेत, असेही कौस्तुभने सांगितले. अशी २० हेल्मेट एप्रिल महिन्यात हैदराबाद वाहतूक पोलीस शाखेस दिली जाणार आहेत. (वृत्तसंस्था)किंमत साडेपाच हजार-या हेल्मेटमधील हवेच्या तापमानाचे नियंत्रण करणारी यंत्रणा बॅटरीवर चालते. दोन तास चालणाºया बॅटरीच्या हेल्मेटची किंमत पाच हजार रुपये तर आठ तासाच्या बॅटरीच्या हेल्मेटची किंमत ५,५०० रुपये आहे.