शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

अभाविप व डाव्या पक्षाच्या विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी; जेएनयूत पुन्हा राडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 10:42 IST

दिल्लीतील प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू विद्यापीठात रविवारी रात्री जेवणाच्या मेन्यूवरून दोन गटांमध्ये हाणामारी झाली. यात काही विद्यार्थी जखमी झाले.

नवी दिल्ली :

दिल्लीतील प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू विद्यापीठात रविवारी रात्री जेवणाच्या मेन्यूवरून दोन गटांमध्ये हाणामारी झाली. यात काही विद्यार्थी जखमी झाले. यात दोन्ही गटांनी एकमेकांवर आरोपप्रत्यारोप केले. या प्रकरणी जेएनयूच्या कुलसचिवांनी विद्यार्थ्यांना शांत राहण्याचे आवाहन केले, तर पोलिसांनी अनेक विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले.

जवळपास दोन वर्षांपूर्वी जेएनयूमध्ये दोन गटांत तुफान हाणामारी झाली होती. रविवारी रात्री पहिल्यांदा पूजा करण्यावरून अभाविप व डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांमध्ये वादावादी झाली. 

रामनवमीनिमित्त कावेरी वसतिगृहात पूजा व हवन आयोजित केला होता. यावर काही विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदविला. परंतु, वसतिगृहाच्या अधिकाऱ्यांनी दोन्ही गटांच्या विद्यार्थ्यांना शांत केल्यानंतर हवन शांतपणे पार पडले. 

भोजनावेळी हा वाद पुन्हा उफाळून आला. भोजनामध्ये मांसाहारी पदार्थ होते. यावर अभाविपच्या विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला. रामनवमीच्या दिवशी मांसाहार कसा झाला, यावरून दोन्ही गटांच्या विद्यार्थ्यांमध्ये वादावादी झाली. त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. काही विद्यार्थी जखमी झाले. यासाठी डाव्या विचारसरणीचे विद्यार्थी जबाबदार असल्याचा आरोप जेएनयूच्या अभाविपचे सचिव उमेश अजमेरा यांनी केला आहे. या आरोपांचा डीएसएफ या संघटनेने इन्कार केला आहे. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी लाठ्या घेऊन हल्ला केल्याचा आरोप केला आहे. या दोन्ही बाजूंच्या विद्यार्थ्यांना चाणक्यपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले.

कुलसचिव काय म्हणाले...- या घटनेवर जेएनयूचे कुलसचिव प्रो. रविकेश यांनी निवेदन प्रसिद्ध करून जेएनयूची बाजू मांडली आहे. जेएनयूच्या मेसचे संचालन विद्यार्थी समितीकडून होते.- त्यामुळे भोजनामध्ये कोणते पदार्थ शिजवायचे, हा त्यांचा प्रश्न असल्याचे निवेदनात म्हटले आहे. जेएनयूला मोठा शैक्षणिक वारसा लाभला आहे. - हा वारशाचे जतन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सहकार्य करावे. यात बाहेरच्या शक्तींनी हस्तक्षेप करू नये, असेही या निवेदनात म्हटले आहे. 

टॅग्स :jnu - jawaharlal nehru universityजेएनयू