आपल्याच आंदोलनात ABVP चा कार्यकर्ता भाजला
By Admin | Updated: March 16, 2016 17:01 IST2016-03-16T16:55:06+5:302016-03-16T17:01:03+5:30
असदुद्दीन ओवेसी यांच्याविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आयोजित केलेल्या आंदोलनात त्यांचाच कार्यकर्ता जळाला

आपल्याच आंदोलनात ABVP चा कार्यकर्ता भाजला
ऑनलाइन लोकमत -
कानपूर, दि. १६ - ऑल इंडिया मजलीस इत्तेहदुअल मुस्लिमीनचे (एमआयएम) अध्यक्ष तथा हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्याविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आयोजित केलेल्या आंदोलनात त्यांचाच कार्यकर्त्याच्या कपड्याने पेट घेतला व किरकोळ जखमी झाला. असदुद्दीन ओवेसी यांनी 'भारत माता की जय' म्हणणार नाही असं वक्तव्य केल्याच्या विरोधात हे आंदोलन करण्यात येत होतं. आंदोलनादरम्यान असदुद्दीन ओवेसी यांचा पुतळा जाळण्यात आला. मात्र या आगीची ठिणगी लागून एबीव्हीपीचा कार्यकर्ता भाजल्यामुळे जखमी झाला. उपस्थित विद्यार्थ्यांनी लगेच त्याचे जळालेले कपडे काढून वाचवले. मात्र त्यात तो जखमी झाला आहे. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
WATCH: ABVP worker catches fire while burning Asaduddin Owaisi's effigy in Kanpur.https://t.co/efATxD6kee
— ANI (@ANI_news) March 16, 2016