अभिजित : पिके धोक्यात येण्याची चिन्हे

By Admin | Updated: July 10, 2015 21:26 IST2015-07-10T21:26:51+5:302015-07-10T21:26:51+5:30

पावसाची दडी : शेतकर्‍यांना आर्थिक फटका

Abused: signs of danger threatening crops | अभिजित : पिके धोक्यात येण्याची चिन्हे

अभिजित : पिके धोक्यात येण्याची चिन्हे

वसाची दडी : शेतकर्‍यांना आर्थिक फटका
वाफगाव : वीस दिवसांपासून खेड तालुक्यात कुठेही पावसाचा शिडकावदेखील न झाल्याने पिके धोक्यात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यात खेड तालुक्याच्या पूर्व भागातील गुळाणी, वाकळवाडी, वाफगाव, वरुडे, चिंचबाईवाडी, जऊळके बुद्रुक, कनेरसर, गोसासी ही गावे शेतीसाठी निव्वळ पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत पाऊस नाही झाला, तर येथील शेतकर्‍यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
या परिसरात २० दिवसांपूर्वी काही प्रमाणात पाऊस पाऊस झाल्याने जवळपास ८० ते ९० टक्के शेतकर्‍यांनी बटाटापिकाची लागवड केली गेली आहे. परंतु, सध्या पावसाने मोठी दडी मारल्याने १५ दिवसांपूर्वी लागवड झालेल्या बटाटापिकाला धोका निर्माण होण्याची चिन्हे आहेत, असे येथील शेतकरी सांगतात.
या भागात पावसाळ्यात जवळपास ९० ते ९५ टक्के क्षेत्रावर अमेरिकन बटाटावाणाची लागवड करण्यात आली होती. हा उत्पादित झालेला संपूर्ण माल प्रक्रिया उद्योगासाठी वापरला जातो. पेप्सिको, हल्दीराम, पारले आदी कंपन्या या बटाटामालाची खरेदी वेफर्स व बटाट्यापासून तयार होणारे विविध पदार्थ बनविण्यासाठी करतात. त्यामुळे इतर बटाटावाणापेक्षा याचा भांडवली खर्च अधिक असतो. यामध्ये एकरी बटाटा बियाणे- ३२,००० हजार, खते- १२,०००, औषधे व कीटकनाशके- ६,००० व मजुरी- ५,००० हजार असा जवळपास ५५ ते ६० हजार रुपये एकरी भांडवली खर्च येतो. सध्या या परिसरातील ८० ते ८५ टक्के शेतकर्‍यांनी हा खर्च केला आहे; परंतु वरुणदेवतेने वक्रदृष्टी फिरवल्याने या भागातील बटाटापीक धोक्यात येण्याची चिन्हे आहेत.
या भागातील ९० टक्यांपैकी फक्त १० टक्के शेतकर्‍यांकडे स्वत:च्या विहिरीतून पिकाला पाणी देण्याची सोय आहे. त्यामुळे काही शेतकरी तुषार सिंचनाद्वारे बटाटापिकाला पाणी देऊन ते जगविण्याची धडपड करताना दिसू लागले आहेत; परंतु ज्यांच्याकडे पिकाला पाणी देण्याची व्यवस्था नाही, अशा शेतकर्‍यांचा जीव टांगणीला लागला आहे.
फोटो ओळ : बटाटापीक जगावे म्हणून तुषार सिंचनाद्वारे पाणी देताना शेतकरी.
०००

Web Title: Abused: signs of danger threatening crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.