काश्मीरमध्ये लष्कर-ए-तोयबाचा कमांडर अबू कासिम ठार
By Admin | Updated: October 29, 2015 09:25 IST2015-10-29T08:39:10+5:302015-10-29T09:25:51+5:30
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर आणि २०१३ सालच्या उधमपूर हल्ल्याच्या सूत्रधार अबू कासिम श्रीनगरमधील चकमकीत ठार झाला आहे.

काश्मीरमध्ये लष्कर-ए-तोयबाचा कमांडर अबू कासिम ठार
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. २९ - जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरपासून सुमारे ४० किमी अंतरावर असलेल्या बांदीपोरा येथे १४ व्या राष्ट्रीय रायफलच्या जवानांशी झालेल्या चकमकीदरम्यान 'लष्कर-ए-तोयबाचा' कमांडर अबू कासिम ठार झाला आहे. कासिम हा २०१३ साली उधमपूरमदील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार होत, त्या हल्ल्यात ८ जवान शहीद झाले होते.
लष्कराच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी गस्तीवर असलेल्या १४ व्या राष्ट्रीय रायफलच्या पथकावर हल्ला करून दहशतवादी जंगलात लपले होते. त्यांना शोधण्यासाठी सुरू केलेल्या कारवाईदरम्यान जवान व दहशतवादी यांच्यात चकमक झाली. त्यात अबू कासिम ठार झाला असून चकमक अद्याप सुरूच आहे.
दरम्यान जंगलात लपण्याआधी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या १४ व्या राष्ट्रीय रायफलचा एक जवान शहीद झाल्याचे समजते.