फरार कैदी जावीरचा कर्नाटकात वावर साथीदारांनी दिले दहा हजार रुपये खर्चाला

By Admin | Updated: December 19, 2014 00:27 IST2014-12-18T22:39:38+5:302014-12-19T00:27:31+5:30

कोल्हापूर : पन्हाळा न्यायालयात खटल्यासंदर्भात घेऊन जात असताना पोलिसांवर हल्ला करून पसार झालेला कैदी व कुख्यात गुन्हेगार विजय जावीर हा आणखी काही साथीदारांसमवेत कर्नाटकात वावरत असल्याची माहिती कोल्हापूर पोलिसांना मिळाली आहे. अटक केलेल्या साथीदारांनी जावीर याला दहा हजार रुपये खर्चासाठी दिले असून तो कर्नाटकात मित्रांच्या आसर्‍याला गेल्याची माहिती दिली आहे. त्यानुसार पोलिसांचे एक पथक कर्नाटकात तळ ठोकून आहे.

The absconding prisoner, Javir, spent Rs 10,000 on the Karnaatak in Varanasi for the devotees | फरार कैदी जावीरचा कर्नाटकात वावर साथीदारांनी दिले दहा हजार रुपये खर्चाला

फरार कैदी जावीरचा कर्नाटकात वावर साथीदारांनी दिले दहा हजार रुपये खर्चाला

कोल्हापूर : पन्हाळा न्यायालयात खटल्यासंदर्भात घेऊन जात असताना पोलिसांवर हल्ला करून पसार झालेला कैदी व कुख्यात गुन्हेगार विजय जावीर हा आणखी काही साथीदारांसमवेत कर्नाटकात वावरत असल्याची माहिती कोल्हापूर पोलिसांना मिळाली आहे. अटक केलेल्या साथीदारांनी जावीर याला दहा हजार रुपये खर्चासाठी दिले असून तो कर्नाटकात मित्रांच्या आसर्‍याला गेल्याची माहिती दिली आहे. त्यानुसार पोलिसांचे एक पथक कर्नाटकात तळ ठोकून आहे.
विजय जावीर याला पळून जाण्यास मदत करणारे साथीदार संशयित बाळासाहेब गावडेकर (रा. प्रगतीनगर, पाचगाव), दत्तात्रय बबन माळवदे (कारंडे मळा, इचलकरंजी), आबा भगवान गरड (तारदाळ) व रामा कचरू गरड (रा. झोपडप˜ी, इचलकरंजी) यांच्या मुसक्या आवळून त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी जावीर याचे कर्नाटकातील गुन्हेगारांशी लागेबांधे आहेत. त्यांच्या आश्रयाला तो गेला असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलीस कर्नाटक पोलिसांच्या मदतीने जावीरचा शोध घेत आहेत. जावीरला पळवून नेण्यामागे मोठे रॅकेट असून त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड, पुणे, मुंबई आणि कर्नाटक राज्यात पथके रवाना केली आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The absconding prisoner, Javir, spent Rs 10,000 on the Karnaatak in Varanasi for the devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.