शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

ABP News C-Voter Survey: दहा दिवसांत युपीतील वारे फिरले; सी वोटर सर्व्हेमुळे योगींचे टेन्शन वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 16:04 IST

ABP News C-Voter ने नुकत्याच केलेल्या सर्व्हेमध्ये उत्तर प्रदेशमधील वारे फिरू लागल्याचे दिसत आहे. जनता यावेळीही मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथांनाच पाहू इच्छित आहेत.

देशातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे सुरु झाले आहेत. अद्याप तारखा जाहीर झालेल्या नसल्या तरी देखील पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. प्रचारही सुरु केला आहे. यामुळे सर्व्हे करणाऱ्या संस्था, कंपन्यादेखील उत्तर प्रदेशात नेमकी कोणाची हवा, हे जाणून घेण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत. रोज सभा, बैठका होऊ लागल्या आहेत. गेल्या निवडणुकीत सपामध्ये यादवी झाल्याने त्याचा फायदा भाजपाला झाला होता. परंतू कालच माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि काका शिवपाल यादव पुन्हा एकत्र आले आहेत. यामुळे भाजपाला कडवी टक्कर द्यावी लागण्याची चिन्हे आहेत. 

ABP News C-Voter ने नुकत्याच केलेल्या सर्व्हेमध्ये उत्तर प्रदेशमधील वारे फिरू लागल्याचे दिसत आहे. जनता यावेळीही मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथांनाच पाहू इच्छित आहेत. मात्र, त्यांची लोकप्रियता घटली आहे. गेल्या आठवड्यात समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची लोकप्रियचा वाढली आहे. 

एबीपी न्यूज-सी वोटरने याआधीही सर्व्हे केला होता. 6 डिसेंबरच्या सर्व्हेनुसार 44 टक्के लोक योगी आदित्यनाथांना मुख्यमंत्री पाहू इच्छित आहेत. तर 15 डिसेंबरला हा आकडा 42 टक्क्यांवर आला आहे. दहा दिवसांत योगींची लोकप्रियता दोन टक्क्यांनी घसरली आहे. दुसरीकडे अखिलेश यादव यांच्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे. सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या 34 टक्के लोकांना अखिलेश मुख्यमंत्री व्हावेत असे वाटत आहे. 6 डिसेंबरला 31 टक्के लोकांना ते मुख्यमंत्री व्हावेत असे वाटत होते. 

माजी मुख्यमंत्री आणि बसपाच्या अध्यक्षा मायावती यांची लोकप्रियता देखील घटली आहे. 15 डिसेंबरला झालेल्या सर्व्हेमध्ये 14 टक्के लोकांनी त्यांनी सीएमपदासाठी निवडले. तर 6 डिसेंबरला 16 टक्के लोकांनी त्यांना मुख्यमंत्री पदासाठी पहिली पसंत म्हटले होते. मायावतींच्या लोकप्रियतेत घट झाली आहे. 

योगींचे कामकाज कसे आहे?सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या 43 टक्के लोकांनी योगींचे काम चांगले म्हटले. 20 टक्के लोकांनी सरासरी म्हटले, तर 37 टक्के लोकांनी असंतुष्ट असल्याचे म्हटले आहे. 

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवyogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेश