अबब! पाच हजार लोकांना चावले कुत्रे
By Admin | Updated: February 11, 2015 23:19 IST2015-02-11T23:19:20+5:302015-02-11T23:19:20+5:30
हायकोर्टात प्रतिज्ञापत्र : गेल्या वर्षातील आकडेवारी

अबब! पाच हजार लोकांना चावले कुत्रे
ह यकोर्टात प्रतिज्ञापत्र : गेल्या वर्षातील आकडेवारीनागपूर : ऐकून आश्चर्य वाटेल पण, हे खरे आहे. गेल्यावर्षी ५०८७ लोकांना कुत्रे चावले आहेत. ही माहिती केवळ मेडिकल व मेयो रुग्णालयातील आहे. यात खासगी रुग्णालयात किंवा अन्य प्रकारचा उपचार घेणाऱ्या लोकांचा समावेश नाही. यामुळे मूळ आकडेवारी यापेक्षा निश्चितच अधिक आहे. मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाच्या आदेशावरून राज्य शासनाने बुधवारी ही माहिती सादर केली. त्यानुसार जानेवारी ते डिसेंबर-२०१४ या कालावधीत कुत्र्यांनी चावलेल्या २५९० लोकांची मेडिकलमध्ये, तर २५७८ लोकांची मेयोमध्ये नोंद आहे. शहरात मोकाट कुत्रे हैदोस घालीत असल्यामुळे अनिरुद्ध गुप्ते व इतरांनी जनहित याचिका दाखल केली आहे. महानगरपालिका कारवाई करीत नसल्यामुळे मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. रस्त्याने जाणाऱ्या वाहनांवर कुत्र्यांच्या टोळ्या झडप घालतात. मोकाट कुत्र्यांची रात्री सर्वाधिक भीती असते. शासकीय इमारती व रुग्णालयांमध्ये मोकाट कुत्र्यांचा मुक्त संचार असतो. मेडिकलमध्ये नवजात बाळांना कुत्र्यांनी कुरतडून खाल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. यासंदर्भात महानगरपालिकेने गंभीरतेने उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. फिरदोस मिर्झा यांनी बाजू मांडली.