शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नाव काढू नको 'त्या' उज्ज्वलाचं, 85% लाभार्थी सिलिंडरऐवजी चुलीवरच बनवतात जेवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 15:39 IST

भाजपा सरकारनं आपल्या यशस्वी योजनांचा लेखाजोगा जनतेपुढे मांडत आहे.

नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. भाजपा सरकार आपल्या यशस्वी योजनांचा लेखाजोगा जनतेपुढे मांडत आहे. या योजनांमध्ये उज्ज्वला योजनेचाही समावेश आहे. परंतु या योजनेसंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. हिंदूच्या रिपोर्टनुसार, देशातल्या चार राज्यांतील या योजनेतील 85 टक्के लाभार्थी हे अद्यापही चुलीवर जेवण बनवत आहेत. रिसर्च इन्स्टिट्युट फॉर कम्पेसनेट इकोनॉमिक्सच्या नव्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे.बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या चार राज्यांतील उज्ज्वला योजनेचे 85 टक्के लाभार्थी अद्यापही चुलीवरच जेवण बनवण्यास हतबल आहेत. याच्या मागे आर्थिक कारणांसह लैंगिक असमानता असल्याचंही उघड झालंय. चुलीवर जेवण बनवल्यानंतर धुरानं नवजात बाळाचा मृत्यू, फुफ्फुसाचे आजार बळावतात. हा सर्व्हे 2018ला करण्यात आला आहे. यात चार राज्यांतील 11 जिल्ह्यांमधील 1150 कुटुंबीयांचा समावेश आहे. या कुटुंबीयांसपैकी 98 टक्क्यांहून अधिक लोकांच्या घरात चुलीवरच जेवण तयार केलं जातं. उज्ज्वला योजनेतील लाभार्थी हे अत्यंत गरीब असल्यामुळे सिलिंडर घेणं त्यांना परवडण्याजोगं नाही. एखादा सिलिंडर वापरून रिकामा झाल्यानंतर तो लागलीच भरण्याएवढा त्यांच्याकडे पैसा नसतो. 70 टक्के लोकांना चुल्हीवर जेवण बनवण्यासाठी काहीही खर्च येत नाही. सिलिंडरच्या तुलनेत चुल्हीवर जेवण बनवणं या लोकांना स्वस्त पडतं.महिला शेणापासून तयार केलेल्या गोवऱ्यांचा वापर करतात, तर पुरुष मंडळी जंगलातून लाकडं तोडून आणतात. त्यामुळे चुलीवर जेवण बनवणं तसं अजिबात खर्चिक नाही. तर एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती वाढत असल्यानं ते अत्यंत गरीब कुटुंबांना भारी पडतं. गॅस शेकडीवर बनवलेलं जेवण खाल्ल्यानंतर पोटात गॅस जमा होत असल्याचीही ग्रामीण भागातील लोकांची धारणा आहे. तर दुसरीकडे चुलीवर लाकूड जाळून बनवलेलं जेवण हे चविष्ट असून, त्यामुळे कोणताही त्रास होत नसल्याचं या लोकांचं म्हणणं आहे.2016ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उज्ज्वला योजनेची घोषणा केली. स्वच्छ इंधन, बेहत्तर जीवन’ असा नारा देत केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत देशातील दारिद्र्यरेषेखालील कोट्यवधी महिलांना गॅस सिलिंडरचे वाटप करण्यात आले होते. परंतु वाढत्या महागाईत या गरीब कुटुंबांना गॅसचं सिलिंडर घेणं परवडण्यासारखं नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Pradhan Mantri Ujjwala Yojanaप्रधानमंत्री उज्ज्वला योजनाgovernment schemeसरकारी योजनाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Narendra Modiनरेंद्र मोदी