शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

TMC खासदार अभिषेक बॅनर्जींच्या पत्नीला पुन्हा कोलकाता विमानतळावर रोखले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2023 13:51 IST

इमिग्रेशन विभागाच्या अधिकार्‍यांनी रुजिरा बॅनर्जी यांना परदेशात जाण्यास मनाई केली.

कोलकाता : तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि पक्षाचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या पत्नी रुजिरा बॅनर्जी यांना सोमवारी कोलकाता विमानतळावरील इमिग्रेशन विभागाच्या अधिकाऱ्यांनी परदेशात जाण्यापासून रोखले. मिळालेल्या माहितीनुसार, रुजिरा बॅनर्जी आपल्या दोन मुलांसह सकाळी सात वाजता विमानतळावर पोहोचल्या होत्या. त्यांची दुबईला जाण्यासाठी फ्लाइट होती.

इमिग्रेशन विभागाच्या अधिकार्‍यांनी रुजिरा बॅनर्जी यांना परदेशात जाण्यास मनाई केली. दरम्यान, ईडीने एका प्रकरणात लुकआउट नोटीस जारी केली होती. त्याचा हवाला देत रुजिरा बॅनर्जी यांना परदेशात जाण्यापासून रोखले. इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी रोखल्यानंतर रुजिरा बॅनर्जी सकाळी 11 च्या सुमारास विमानतळावरून घरी परतल्या. दुसरीकडे, सर्वोच्च न्यायालयाने अभिषेक आणि त्यांच्या पत्नीला परदेशात जाण्याची परवानगी दिली आहे, असे अभिषेक बॅनर्जी यांच्या जवळच्या सहकाऱ्याने सांगितले. तर सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानाचा हवाला देत अभिषेक आणि रुजिरा बॅनर्जी या प्रकरणी कायदेशीर पावले उचलू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, कोळसा तस्करी प्रकरणी ईडीने अभिषेक आणि रुजिरा बॅनर्जी यांची अनेकदा चौकशी केली आहे. या संदर्भात अभिषेक यांनाही दिल्लीत बोलावण्यात आले आहे.

टॅग्स :Airportविमानतळairplaneविमान