शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ममता बॅनर्जींचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींना पाठवली अब्रुनुकसानीची नोटीस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2019 20:11 IST

 यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान  नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात जोरदार वाकयुद्ध रंगले होते.

कोलकाता -  यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान  नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात जोरदार वाकयुद्ध रंगले. दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीचे प्रसंगही अनेकदा घडले. त्यामुळे दोन्ही नेत्यांच्या पक्षांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. दरम्यान, ममता बॅनर्जींचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना अब्रुनुकसानीची नोटीस बजावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील प्रचारसभांदरम्यान ममता बॅनर्जी आणि त्यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्यावर  आरोपांच्या जोरदार फैरी झाडल्या होत्या. दरम्यान, मोदींनी 15 मे रोजी डायमंड हार्बर येथील प्रचारसभेमध्ये केलेल्या आरोपांप्रकरणी अभिषेक बॅनर्जी यांनी मोदींना अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्यापूर्वी मोदींच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 

 पश्चिम बंगालमध्ये यावेळी तृणमूल काँग्रेस आणि भाजपामध्ये चुरशीची लढाई झाली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये अनेक ठिकाणी हिंसक हाणामाऱ्याही झाल्या होत्या. विशेषत: अमित शहा यांच्या रोड शो नंतर कोलकात्यामध्ये दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमधील निवडणुकीचा प्रचार एक दिवस आधीच थांबवण्याचे आदेश दिले होते. आता पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या 9 मतदारसंघांसाठी रविवारी मतदान होणार आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९tmcठाणे महापालिकाMamata Banerjeeममता बॅनर्जीWest Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019