शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

#AbhinandanMyHero...विंग कमांडर अभिनंदन वर्धमानसाठी सोशल मीडिया एकवटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2019 15:29 IST

पाकिस्तानी लढाऊ विमानांनी केलेला हल्ला परतवून लावताना विमान कोसळून पाकिस्तानच्या तावडीत सापडलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेबाबत पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने मोठे विधान केले आहे.

पाकिस्तानचा हवाई हल्ला परतवून लावताना पाकिस्तानच्या हद्दीत अडकलेले विंग कमांडर वर्धमान यांच्या सुटकेसाठी सोशल मीडियावर नेटीझन्सन मोहीम सुरू केली आहे. #AbhinandanMyHero, #अभिनंदन #GiveBackAbhinandan असे हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करत आहेत. तसेच भारत सरकारने कुठल्याही परिस्थिती अभिनंदला परत आणावे, अशी भावनाही नेटीझन्सकडून व्यक्त होत आहे. तर, अभिनंदन यांच्या शौर्याला सॅल्यूट करण्यात येत आहे.  पाकिस्तानी लढाऊ विमानांनी केलेला हल्ला परतवून लावताना विमान कोसळून पाकिस्तानच्या तावडीत सापडलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेबाबत पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने मोठे विधान केले आहे. विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेबाबत भारताशी चर्चा करण्यास तयार असल्याचे वक्तव्य पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे. तत्पूर्वी भारतीय नागरिकांनी सरकारवर दबाव वाढवला असून अभिनंदनला परत आणण्याच मागणी केली आहे.

#AbhinandanMyHero, #अभिनंदन #GiveBackAbhinandan असे हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करत आहेत. तर फेसबुक, इंस्टाग्राम येथेही अभिनंदनच्या नावानेच दिवसाची सुरूवात झाल्याचे पाहायला मिळाले. एका व्हायरल व्हिडीओत पाकिस्तानी सैन्यापुढे अभिनंदन ज्या धाडसाने बोलला, त्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. अभिनंदनने आपली माहिती देण्यास नकार दिला. त्यामुळे अभिनंदन हाच भारताचा खरा हिरो असल्याचं सोशल मीडियावर म्हटलं जात आहे. त्यामुळेच #AbhinandanMyHero हा हॅशटॅगही ट्रेंड करत आहे. विशेष म्हणजे बिग बी अमिताभ यांनीही अभिनंदनच्या सुटकेसाठी प्रार्थना केली असून बॉलिवूडच्या अभिनंदनच्या पाठिशी ठामपणे उभे असल्याचे सांगण्यात आले आहे. 

दरम्यान, अभिनंदन वर्धमान यांच्या वडिलांनीही मुलाला पाठिंबा आणि शुभेच्छा दिल्याबद्दल देशावासीयांचे आभार मानले आहेत. त्यांनी एक संदेश लिहिला आहे. अभिनंदन वर्धमान यांचे वडील सिमहाकुट्टी वर्धमान भारतीय हवाई दलातून एअर मार्शल म्हणून निवृत्त झाले. सिमहाकुट्टी वर्धमान यांनी संदेशात म्हटले आहे की, 'मी देवाचे आभार मानतो की, माझा मुलगा जिवंत आहे, जखमी नाही, मानसिकदृष्ट्या ठीक आहे. तो ज्या धाडसाने बोलत आहे ते पाहा....एक खरा जवान.... आम्हाला त्याचा अतिशय अभिमान आहे'. याचबरोबर, महत्वाच्यावेळी सर्वांनी सोबत दिल्याबद्दल आपला आभारी आहे. तुमच्या पाठिंब्यामुळे आम्हाला बळ मिळत आहे, असेही सिमहाकुट्टी वर्धमान यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Abhinandan Varthamanअभिनंदन वर्धमानPakistanपाकिस्तानindian air forceभारतीय हवाई दलIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकSocial Mediaसोशल मीडिया