शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
3
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
4
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
9
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
10
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
11
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
12
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
13
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
14
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
15
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
16
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
17
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
18
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

विंग कमांडर अभिनंदन यांच्या स्क्वाड्रनचा वायुदलाकडून होणार विशेष सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2019 11:01 IST

मिग-21 विमानातून एफ-16 सारखं अत्याधुनिक विमान जमीनदोस्त करणाऱ्या विंग कमांडर अभिनंदन यांच्या स्क्वाड्रनचा सन्मान केला जाणार आहे.

ठळक मुद्देमिग-21 विमानातून एफ-16 सारखं अत्याधुनिक विमान जमीनदोस्त करणाऱ्या विंग कमांडर अभिनंदन यांच्या स्क्वाड्रनचा सन्मान केला जाणार आहे. अभिनंदन यांच्या स्क्वाड्रन 51चा वायुदलाकडून विशेष सन्मान होणार आहे.एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंह भदौरीया हे अभिनंदन यांच्या स्क्वार्डनचा सन्मान करणार आहेत. 

नवी दिल्ली - मिग-21 विमानातून एफ-16 सारखं अत्याधुनिक विमान जमीनदोस्त करणाऱ्या विंग कमांडर अभिनंदन यांच्या स्क्वाड्रनचा सन्मान केला जाणार आहे. अभिनंदन यांच्या स्क्वाड्रन 51चा वायुदलाकडून विशेष सन्मान होणार आहे. पाकिस्तानचा हवाई घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडल्याच्या कामगिरीबद्दल हा सन्मान केला जाणार आहे. एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंह भदौरीया हे अभिनंदन यांच्या स्क्वार्डनचा सन्मान करणार आहेत. 

भारतातील पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायूदलाने पाकिस्तानच्या बालाकोट येथे एअर स्ट्राइक करत दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. याचदरम्यान पाकिस्तानच्या एफ-16 लढाऊ विमानाचा पाठलाग करताना भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचे मिग-21 विमान चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेले होते. विमानाला आग लागल्याने अभिनंदन यांनी पॅराशूटने बाहेर उडी मारली होती आणि ते पाकव्याप्त काश्मीरमध्ये पडले होते. पाकिस्तानने लगेच त्यांना कैदेत घेतले होते.  कैदेत असताना त्यांच्याकडून भारतीय लष्कराची महत्त्वपूर्ण माहिती काढून घेण्यासाठी पाकिस्तानच्या लष्कराने आटोकाट प्रयत्न केला; परंतु अभिनंदन यांनी पाकिस्तानचा हा मनसुबा मोठ्या हुशारीने आणि खंबीरपणे उधळून लावला होता. 

विंग कमांडर अभिनंदन यांना वीरचक्र प्रदान करण्यात आले आहे. कंट्रोल रूममधली परिस्थिती भारतीय हवाई दलाच्या स्क्वाड्रन लीडर मिंटी अग्रवाल यांनाही वीरचक्र प्रदान करण्यात आले आहे. त्यानंतर आता अभिनंदन यांच्या स्क्वाड्रन 51चा वायुदलाकडून सन्मान विशेष सन्मान होणार आहे. आमची हवाई दलाची टीम 26 जुलैला बालाकोटवर हवाई हल्ला करून यशस्वीरित्या माघारी परतली होती. आमच्याकडे हवाई सीमेचे रक्षण करण्यासाठी कमी विमाने होती. ते (पाकिस्तानी) भारतात विध्वंस करण्याच्या उद्देशाने मोठ्या संख्येने घुसले होते. मात्र, आमच्या पायलटनी धाडस दाखविल्याने त्यांचे मनसुबे उद्ध्वस्त झाले, असं अग्रवाल यांनी म्हटलं होतं. 

अटीतटीच्या क्षणांवेळी अभिनंदन यांनी अमेरिकेने पाकिस्तानला दिलेले एफ-16 पाडले. तेव्हाची परिस्थिती युद्धाची होती. त्यांची विमाने मोठ्या संख्येने होती आणि आमच्या लढाऊ विमानांनी त्यांना कडवी झुंज दिली. 26 आणि 27 तारखेच्या लढाईमध्ये मी देखील सहभागी होते. अभिनंदन यांच्यासोबत दोन्ही बाजुने संभाषण करत होते. जेव्हा त्यांचे विमान हवेत होते, तेव्हा त्यांना दुष्मनाच्या विमानांचा अचूक ठावठिकाणा कळवत होते. अभिनंदन यांना आसपासच्या परिस्थितीचे माझ्याकडून योग्य मार्गदर्शन झाल्याने पाकिस्तानला सळो की पळो करून सोडता आल्याची माहिती मिंटी अग्रवाल यांनी दिली होती. 

 

टॅग्स :Abhinandan Varthamanअभिनंदन वर्धमानPakistanपाकिस्तानIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकIndiaभारत