अभिजित : यवतला वरसगाठ सोहळ्यानिमित्त विविध उपक्रम

By Admin | Updated: June 15, 2015 21:29 IST2015-06-15T21:29:43+5:302015-06-15T21:29:43+5:30

जैन श्वेतांबर मंदिर : कलशावरील ध्वज बदलला

Abhijit: Various activities for Yavataw Varasgaath celebrations | अभिजित : यवतला वरसगाठ सोहळ्यानिमित्त विविध उपक्रम

अभिजित : यवतला वरसगाठ सोहळ्यानिमित्त विविध उपक्रम

न श्वेतांबर मंदिर : कलशावरील ध्वज बदलला
यवत : येथील श्री सुमतिनाथ जैन श्वेतांबर मंदिराचा पहिला वरसगाठ सोहळा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मंदिराच्या कलशावरील ध्वज बदलण्यात आला. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
प.पू. आचार्य श्री विश्वकल्याण सुरीश्वरजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मागील वर्षी यवतमध्ये पूर्ण संगमरवरी बांधकाम केलेल्या मंदिराचा प्राणप्रतिष्ठापना व अंजनशलाका महोत्सव साजरा करण्यात आला होता. त्यानंतर एक वर्षानंतर प.पू. आचार्य श्री विश्वकल्याण सुरीश्वरजी महाराज यांच्या प्रेरणेने ध्वजाचा मुहूर्त मिळाल्यानंतर आज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
रविवारी सकाळी लोणंद येथील शांतीसेना युवक मंडळाच्या ढोल पथकासह गावातून शोभायात्रा काढण्यात आली. या वेळी श्वेतांबर व दिगंबर जैन समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. मुनीश्री प्रणामसागरजी महाराज यांचे प्रवचन झाले. जैन बांधवांनी एकजुटीने धार्मिक उत्सव साजरे करण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले. गावातील जैन युवक मंडळाने मोठ्या उत्साहात कार्यक्रम पार पाडला.
फोटो ओळ : यवत येथील श्री सुमतिनाथ जैन श्वेतांबर मंदिराचा पहिल्या वरसगाठ सोहळ्यानिमित्त काढण्यात आलेली शोभायात्रा.
०००

Web Title: Abhijit: Various activities for Yavataw Varasgaath celebrations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.