अभिजित : अवघ्या दीड महिन्यात रस्ता उखडला
By Admin | Updated: August 20, 2015 22:09 IST2015-08-20T22:09:54+5:302015-08-20T22:09:54+5:30
वासुंदे परिसर : निकृष्ट दर्जाचे काम

अभिजित : अवघ्या दीड महिन्यात रस्ता उखडला
व सुंदे परिसर : निकृष्ट दर्जाचे काम वासुंदे : रोटी घाट पायथा ते वासुंदेपर्यंतचे राज्य शासनाच्या विशेष दुरुस्ती योजनेअंतर्गत करण्यात आलेले डांबरीकरणाचे काम अवघ्या दीड महिन्यात अनेक ठिकाणी उखडले आहे. या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे या रस्त्याच्या कामाचा दर्जा व कामावर असलेले संबंधित विभागाचे नियंत्रण याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पालखीमार्गाचे अनेक वर्षांपासून काम न झाल्याने याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. परिणामी या मार्गावरुन दैनंदिन जाणार्या व येणार्या प्रवाशांना व वाहनचालकांना तसेच संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्यातील वारकरी भक्तांना खडतर प्रवास करावा लागत होता. त्यामुळे या मार्गावरुन प्रवास करणार्या प्रवाशांची, वाहनचालकांची तसेच स्थानिक नागरिकांची रस्त्याचे काम होण्याची मागणी होत होती. पाटस-वासुंदे-बारामती या राज्यमार्ग क्र.२३ च्या वासुंदेपासून ८३०० मीटर लांबीच्या व ७ मीटर रुंदीच्या रस्त्याच्या कामासाठी विशेष दुरुस्ती कार्यक्रम सन २०१३ अंतर्गत ३ कोटी ४० लाखांचा निधी मंजूर करण्यात येऊन प्रत्यक्ष रस्त्याच्या कामाचा उद्घाटन समारंभ २३ ऑक्टोबर २०१३ रोजी खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते दौंडचे तत्कालीन आमदार रमेश थोरात यांच्या उपस्थितीत झाला.मात्र, या रस्त्याच्या कामाचे उद्घाटन झाल्यानंतर वेगवेगळ्या कारणास्तव हे डांबरीकरणाचे काम पूर्ण होण्यास विलंब झाला. तसेच अनेक वेळा काम सुरू होऊन ते अनेक वेळा बंदही पडले. त्यामुळे या मार्गाचे काम होणार, की नाही असा प्रश्न निर्माण झाला होता. अखेरीस जून २०१५ च्या अंतिम टप्प्यात म्हणजेच पालखी सोहळा या मार्गावरुन जाण्यापूर्वी हे काम एकदाचे पूर्ण करण्यात संबंधित ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाला यश आले. हे काम पूर्ण होऊन अवघ्या दीड महिन्याच्या कालावधीतच रोटी घाट तसेच या मार्गावरील अनेक ठिकाणी रस्ता उखडायला लागला असून, बर्याच ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे अवघ्या दीड महिन्याच्या कालावधीत जर हे काम उखडले जात असेल, तर सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्चून केलेल्या कामाचा दर्जा काय असेल आणि काम सुरू असताना संबंधित विभागाने किती लक्ष दिले असेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. परिणामी शासनाचे कोट्यवधी रुपये खड्ड्यात गेल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्य प्रवासी, वाहनचालक व ग्रामस्थांकडून येत आहे.चौकटदुरुस्तीबाबत ठेकेदाराला केली सूचना याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग दौंडचे उपअभियंता आर. वाय. पाटील यांनी सांगितले, की रस्त्याच्या केलेल्या कामाचा दोष दायित्व कालावधी काम पूर्ण झाल्यानंतर दोन वर्षांचा असल्याने ज्या ठेकेदाराने काम केले आहे, त्या ठेकेदाराची २ वर्षे रस्ता दुरुस्तीची जबाबदारी असते. त्यामुळे सदर रस्त्याच्या दुरुस्तीबाबत संबंधित ठेकेदाराला सूचना केली आहे.फोटो ओळ : संत तुकाराममहाराज पालखीमार्गाचे विशेष दुरुस्तीमधून केलेले काम अल्प कालावधीतच उखडल्याने ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. (छायाचित्र : गोरख जांबले)20082015-िं४ल्लि-26