अभिजित कोळपे बातमी : विवाहितेच्या छळ प्रकरणी पतीस अटक
By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:07+5:302015-02-14T23:51:07+5:30
लोणी काळभोर : सासू, सासरे, दिर यांच्याविरोधातही गुन्हा दाखल

अभिजित कोळपे बातमी : विवाहितेच्या छळ प्रकरणी पतीस अटक
ल णी काळभोर : सासू, सासरे, दिर यांच्याविरोधातही गुन्हा दाखललोणी काळभोर : पतीच्या दुसर्या मुलीशी असलेल्या प्रेमसंबंधाच्या कारणांवरून होणारी मारहाण, मुदत संपलेल्या औषधी गोळ्या जबरदस्तीने खायला लावणे, पोटात गर्भ आहे, हे माहिती असताना जबरदस्तीने गर्भपात घडवून आणणे, दिराचे असभ्य वर्तन, घरखर्चासाठी माहेरून पैसे आणण्यासाठी होणार्या शारीरिक व मानसिक छळास कंटाळून विवाहितेने पती, दिर, सासरा व सासू यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. पोलिसांनी पतीस अटक केली आहे. भाग्यश्री ऊर्फ तेजस्वी ज्ञानेश्वर जाधव (वय २६, रा. फ्लॅट ८ अ श्री सिद्धीविनायक समृद्धी सोसायटी, होळकरवाडी रोड, हंडेवाडी, सध्या रा. मोरगाव, ता. बारामती) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिचा पती ज्ञानेश्वर रामचंद्र जाधव (वय २८), दिर गणेश, सासरे रामचंद्र फुलचंद जाधव व सासू सुनंदा जाधव या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाग्यश्री व ज्ञानेश्वर यांचा विवाह २५ मे २०११ रोजी मोरगाव (ता. बारामती) येथे झाला. लग्नानंतर सुमारे १५ दिवस तिला व्यवस्थित वागविण्यात आले. ७ जून २०११ रोजी पतीला आलेला मोबाइल तिने घेतला असता एक मुलगी बोलली, म्हणून तिने पतीला याबद्दल विचारले. तेव्हा त्याने ती माझी मैत्रीण असून आमचे दोन वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत व यापुढेही चालू राहतील, असे सांगितले. ही बाब तिने सासू, सासरे यांच्या कानावर घातली असता त्यांनी आम्हाला माहिती आहे. काही बोलू नकोस तो सुधारेल, असा सल्ला दिला. मुलीचे सतत फोन येऊ लागले. तेव्हा भाग्यश्री हिने तिला समजावून सांगितले. मुलीच्या नातलगांना हा प्रकार समजल्यानंतर तिला मारहाण झाली. त्यामुळे पतीने तिला मारले. त्यानंतर बाहेर जाताना तिला घरात ठेवून दाराला कुलूप लावून जात. ऑक्टोबर २०१२ मध्ये पती ज्ञानेश्वर याने तुझ्यामुळे प्रेमसंबंध खराब झाले. तू निघून जा, म्हणत मारहाण करून मुदत संपलेल्या सहा औषधी गोळ्या बळजबरीने खायला लावल्या. तिला चक्कर आली. त्यानंतर भाग्यश्री हिच्या आई-वडिलांनी जाब विचारला असता माफी मागितली, म्हणून त्यांनी तक्रार केली नाही; परंतु क्षुल्लक कारणावरून तिला पुन्हा त्रास देणे सुरूच होते.५ फेब्रुवारी २०१४ रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास जेवण करीत असताना भाजीच्या कारणावरून त्याने जेवणाचे ताट फेकून देऊन तिला मारहाण केली. पोटात दीड महिन्याचा गर्भ आहे, हे माहीत असूनसुद्धा त्याने तिच्या पोटावर हाताने मारले. यामुळे तिचा गभर्पात झाला. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर तिने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात पती, दिर, सासरा व सासू यांच्याविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी तातडीने पती ज्ञानेश्वर जाधव यास अटक केली आहे. पुढील तपास उरुळी देवाची दूरक्षेत्राच्या सहायक पोलीस निरीक्षक एन. एस. हुलवान करीत आहेत.