अभिजित कोळपे बातमी : गुलाबबाबा यात्रेस सोमवारपासून प्रारंभ
By Admin | Updated: February 15, 2015 22:36 IST2015-02-15T22:36:58+5:302015-02-15T22:36:58+5:30
बावडा : रेडा श्री संत सिद्धेश्वर गुलाबबाबा यात्रा सोहळा व श्री काशी विश्वेश्वर यात्रा सोहळा येथे सोमवार (दि. १६) पासून सुरू होत आहे.

अभिजित कोळपे बातमी : गुलाबबाबा यात्रेस सोमवारपासून प्रारंभ
ब वडा : रेडा श्री संत सिद्धेश्वर गुलाबबाबा यात्रा सोहळा व श्री काशी विश्वेश्वर यात्रा सोहळा येथे सोमवार (दि. १६) पासून सुरू होत आहे. तीन दिवस चालणार्या या यात्रामहोत्सवात पहिल्या दिवशी गाडगेबाबा अभियान व ग्रामदेवता पूजा, तसेच शालेय सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. दुसर्या दिवशी श्री संत गुलाबबाबा, साईबाबा, श्री गजानन महाराज, काशी विश्वेश्वर या ग्रामदेवतांची महापूजा, तसेच सार्वजनिक भजन व गुलाबबाबा यांच्या जीवनचरित्रांवरील गीतांचा कार्यक्रम, नंदकुमारमहाराज अरगडे यांचे प्रवचन, संध्याकाळी श्रींच्या पादुकांची महापूजा व मिरवणूक पालखी सोहळा होणार आहे. तिसर्या दिवशी बाळकृष्ण दळवी यांचे काल्याचे कीर्तन व महाप्रसाद तानाजी जगदाळे व एकनाथ मोहिते यांच्या वतीने होणार आहे. यात्रेनिमित्त गावात ग्रामपंचायतीच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे. यात्रेकरूंसाठी जास्तीत जास्त सुविधा पुरविल्या जातील, असे सरपंच अलका देवकर व उपसरपंच विनोद भोसले, देवस्थानचे अध्यक्ष ॲड. तानाजीराव देवकर यांनी सांगितले.