अभिजित कोळपे बातमी : अजिंक्य काटे उपसरपंचपदी

By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:54+5:302015-02-14T23:51:54+5:30

केडगाव : देलवडी (ता. दौंड) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अजिंक्य काटे यांची बिनविरोध निवड झाली. मावळते उपसरपंच बबन शेलार यांनी राजीनामा दिल्याने निवडणूक घेण्यात आली. काटे यांचा एकच अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी नीलेश लोंढे यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.

Abhijit Kollapa News: Ajinkya Kate, Deputy Collector, Panchpanch | अभिजित कोळपे बातमी : अजिंक्य काटे उपसरपंचपदी

अभिजित कोळपे बातमी : अजिंक्य काटे उपसरपंचपदी

डगाव : देलवडी (ता. दौंड) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अजिंक्य काटे यांची बिनविरोध निवड झाली. मावळते उपसरपंच बबन शेलार यांनी राजीनामा दिल्याने निवडणूक घेण्यात आली. काटे यांचा एकच अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी नीलेश लोंढे यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.
या प्रसंगी काटे यांचा सत्कार करण्यात आला. गावाच्या विकासासाठी कटिबद्ध राहीन, असे नवनिर्वाचित उपसरपंच काटे यांनी सांगितले. या वेळी दौंड तालुका राष्ट्रवादी औद्योगिक विकास आघाडीचे अध्यक्ष राजाभाऊ काटे, विकास शेलार, सुभाष गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी भीमा-पाटसचे माजी संचालक तुकाराम वांझरे, माजी संचालिका नीलम काटे, सरपंच लता लव्हटे, बबन शेलार, नानासाहेब शेलार, उत्तम लव्हटे, बाळासाहेब वाघोले, शिवाजी शेलार, लक्ष्मण शेलार, शंकर टुले, विश्वनाथ झांजे, दत्तात्रय शेलार, महेेश शेलार व मान्यवर उपस्थित होते.
फोटो :14022014-िं४ल्लि-04
०००

Web Title: Abhijit Kollapa News: Ajinkya Kate, Deputy Collector, Panchpanch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.