अभिजित : धायगुडेवाडी शाळा झाली हायटेक
By Admin | Updated: August 20, 2015 22:10 IST2015-08-20T22:10:05+5:302015-08-20T22:10:05+5:30
केडगाव : धायगुडेवाडी येथील प्राथमिक शाळेने स्वत:चे संकेतस्थळ तयार केले आहे. या संकेतस्थळावर शाळेची माहिती उपलब्ध होणार आहे. या उपक्रमामुळे धायगुडेवाडी शाळा जिल्ामध्ये हायटेक झाली आहे.

अभिजित : धायगुडेवाडी शाळा झाली हायटेक
क डगाव : धायगुडेवाडी येथील प्राथमिक शाळेने स्वत:चे संकेतस्थळ तयार केले आहे. या संकेतस्थळावर शाळेची माहिती उपलब्ध होणार आहे. या उपक्रमामुळे धायगुडेवाडी शाळा जिल्ामध्ये हायटेक झाली आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त ग्रामस्थ दत्तात्रय काळे व तुकाराम धायगुडे यांच्या हस्ते संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. मुख्याध्यापक महादेव शेलार यांनी उपक्रमाबाबत सांगितले, की सर्व शिक्षकांच्या प्रयत्नातून हे संकेतस्थळ तयार झाले आहे. यामध्ये बोरीपार्धी गाव, बोरमलनाथ देवस्थानची माहिती पंडिता रमाबाई मुक्ती मिशनचे कार्य, बोरीपार्धीचे रहिवासी व दौंडचे माजी आमदार काकासाहेब थोरात व माजी आमदार विठ्ठल पवार, आनंद थोरात यांची माहिती देण्यात आली आहे. याशिवाय शाळेची माहिती, छायाचित्रे, स्पर्धेतील बक्षिसे, शाळेतील विद्यार्थी, बचत बँक, यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. या वेळी मल्हारी गडधे, बाळासाहेब धायगुडे, रघुनाथ सरगर, संजय धायगुडे, सोमनाथ गडधे, जगदीश कोळपे, विलास कोळपे, दत्तात्रय गडधे, सुरेश घाटोळे, बाळासाहेब हांके, सोमनाथ मदने उपस्थित होते. गटशिक्षणाधिकारी गौतम बेलखडे, विस्तार अधिकारी गोरक्षनाथ हिंगणे, भाऊसाहेब कोल्हटकर, कुमार दिवेकर,भाग्यश्री केसकर यांनी मनोगत व्यक्त केले.फोटो ओळ : धायगुडेवाडी येथे जिल्हा परिषद शाळेच्या संकेतस्थळाचे उद्घाटन करताना मान्यवर. 20082015-िं४ल्लि-10