अभिजित : भिगवणमध्ये अनधिकृत पार्किंगवर कारवाई

By Admin | Updated: June 15, 2015 21:29 IST2015-06-15T21:29:42+5:302015-06-15T21:29:42+5:30

भिगवण : भिगवणची मुख्य बाजारपेठ, पुणे-सोलापूर महामार्ग, हायस्कूल रोड, मदनवाडी, चौफुला या ठिकाणी अनधिकृत पार्किंग करणार्‍यांवर कारवाई करण्यात आली. यामुळे भिगवण पोलिसांचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात येत आहे.

Abhijit: Action on unauthorized parking in Bhil | अभिजित : भिगवणमध्ये अनधिकृत पार्किंगवर कारवाई

अभिजित : भिगवणमध्ये अनधिकृत पार्किंगवर कारवाई

गवण : भिगवणची मुख्य बाजारपेठ, पुणे-सोलापूर महामार्ग, हायस्कूल रोड, मदनवाडी, चौफुला या ठिकाणी अनधिकृत पार्किंग करणार्‍यांवर कारवाई करण्यात आली. यामुळे भिगवण पोलिसांचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात येत आहे.
भिगवण (ता. इंदापूर) येथे अनधिकृत पार्किंगच्या समस्येमुळे सर्व्हिस रस्त्यावर वाहन चालविणे जिकिरीचे झाले होते. मात्र, आता आवश्यक पोलिसांची उपलब्धता झाल्याने भिगवण पोलीस स्टेशनचे निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी भिगवणमधील मुख्य रस्ता आणि मदनवाडी पुलाखालील पार्किंग नियोजन केले आहे. तसेच अनधिकृतपणे पार्किंग करणार्‍यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पार्किंगची कोणतीच शिस्त नसल्याने, तसेच येथे बसणार्‍या फेरीवाल्यामुळे रस्त्यांचे बोळीत रूपांतर झालेले होते. आवश्यक पोलीस संख्या नसल्याने पोलिसांना कायदा सुव्यवस्था राखताना दिवसरात्र काम करणे भाग पडत होते.
दरम्यान, ही कारवाई होत असल्याने भिगवणकरांनी समाधान व्यक्त केले. मात्र आता अनधिकृत पार्किंग करणार्‍या वाहनचालकांविरोधात होत असलेल्या कारवाईत सातत्य राहावे. भिगवण बाजारपेठेतून अतिवेगात दुचाकी चालविणार्‍या अल्पवयीन वाहनचालकांवर कारवाई करावी. भिगवण बाजारपेठ आणि सर्व्हिस रोडवरील हॉटेल व्यावसायिक यांना त्यांच्याकडे येणार्‍या ग्राहकांना वाहन रस्त्यावर लागणार नाही, याची काळजी घेण्यासाठी मार्गदर्शन करण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Web Title: Abhijit: Action on unauthorized parking in Bhil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.