शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

‘अभी खेला बाकी है’, जदयू-भाजप युतीवर जवळपास शिक्कामोर्तब

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2024 09:20 IST

Bihar Politics: बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पुन्हा एकदा पर्यायी सरकार स्थापन करण्यासाठी भाजपसोबत करार केल्याचे दिसत असले तरी झपाट्याने बदलणाऱ्या या राजकीय घडामोडींचा अंतिम अध्याय अद्याप लिहिला जाणे बाकी आहे.

- हरीश गुप्तानवी दिल्ली -  बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पुन्हा एकदा पर्यायी सरकार स्थापन करण्यासाठी भाजपसोबत करार केल्याचे दिसत असले तरी झपाट्याने बदलणाऱ्या या राजकीय घडामोडींचा अंतिम अध्याय अद्याप लिहिला जाणे बाकी आहे. कारण, विधानसभेतील रालोआच्या बहुमत चाचणीदरम्यान पक्षाचे ४५ आमदार एकत्र राहतील याबाबत खुद्द नितीशकुमार साशंक आहेत. राजद नेते तेजस्वी यादव यांनी केलेले ‘अभी खेला बाकी है’ हे विधान त्याचे सूचक आहे. याचाच दुसरा अर्थ असा की नितीशकुमार यांचे काही आमदार विविध कारणांमुळे राजद आणि काँग्रेससोबत जाऊ इच्छितात.  

नितीशकुमार यांच्या जदयूसोबत युती केल्यास २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत रालोआ बिहारमधील सर्वच्या सर्व ३९ जागा जिंकेल असे भाजपला वाटते. त्यामुळेच केंद्रीय भाजप नेतृत्व नितीशकुमारांसोबत युती करण्यास उत्सुक आहे. या दोन्ही पक्षांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक एकत्र लढवत ४० पैकी ३९ जागा जिंकल्या होत्या. बिहारमधील नव्या सरकारमध्ये नितीशकुमार यांना मुख्यमंत्रिपदी राहू देऊ नये, अशी भाजपमधील अनेकांची इच्छा आहे. नितीश यांच्यावर विश्वास ठेवता येत नाही. पक्षाने लोकसभेची निवडणूक एकट्याने लढण्याची वेळ आली आहे, असे गिरीराज सिंह यांच्यासारख्या केंद्रीय मंत्र्यांसह पक्षातील अनेक आमदारांचे मत आहे. नितीशकुमार यांच्यासोबत युतीचा निर्णय घेतला गेला असला तरी भाजपचे केंद्रीय नेतृत्व आपले आमदार आणि खासदारांचे म्हणणे जाणून घेण्यासही उत्सुक आहे. काँग्रेस आणि डावे पक्ष कोणतेही वक्तव्य जारी करण्यापूर्वी नितीशकुमार यांच्या अंतिम पावलाची वाट पाहत आहेत. 

 

टॅग्स :BiharबिहारNitish Kumarनितीश कुमारBJPभाजपा