तिसरी आघाडी लवकरच अस्तित्वात येणार अभय चौटालांचा दावा : जनतेला पर्याय हवा
By Admin | Updated: February 20, 2015 01:10 IST2015-02-20T01:10:26+5:302015-02-20T01:10:26+5:30
चंदीगड : भाजपच्या घोडदौडीला लगाम लावण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसेतर पक्षांची तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या प्रयत्नांंना वेग दिला जात आहे. तिसर्या आघाडीचा पर्याय मजबूत ठरू शकतो, असा दावा इंडियन नॅशनल लोकदलाच्या(रालोद) राजकीय व्यवहार समितीचे सदस्य तथा हरियाणातील ऐलनाबादचे आमदार अभयसिंग चौटाला यांनी केला आहे. कोणत्याही परिस्थितीत लवकरच तिसरी आघाडी स्थापन होईल. तिसर्या आघाडीला मूर्त रूप देण्याची प्रक्रिया सुरू होताच या आघाडीत सहभागी होणारा रालोद हा पहिला पक्ष असेल, असेही ते म्हणाले.

तिसरी आघाडी लवकरच अस्तित्वात येणार अभय चौटालांचा दावा : जनतेला पर्याय हवा
च दीगड : भाजपच्या घोडदौडीला लगाम लावण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसेतर पक्षांची तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या प्रयत्नांंना वेग दिला जात आहे. तिसर्या आघाडीचा पर्याय मजबूत ठरू शकतो, असा दावा इंडियन नॅशनल लोकदलाच्या(रालोद) राजकीय व्यवहार समितीचे सदस्य तथा हरियाणातील ऐलनाबादचे आमदार अभयसिंग चौटाला यांनी केला आहे. कोणत्याही परिस्थितीत लवकरच तिसरी आघाडी स्थापन होईल. तिसर्या आघाडीला मूर्त रूप देण्याची प्रक्रिया सुरू होताच या आघाडीत सहभागी होणारा रालोद हा पहिला पक्ष असेल, असेही ते म्हणाले.लालूप्रसाद यादव, नितीशकुमार, शरद यादव आणि मुलायमसिंगसारखे नेते तसेच अनेक राजकीय पक्ष आणि पूर्वाश्रमीच्या जनता दल परिवारातील सर्व घटकांचा त्यात समावेश असेल. बीजू जनता दलासह आणखी तीन पक्षही सहभागी होऊ शकतात. ------------------------जनता माफ करणार नाहीजनतेला भाजप आणि काँग्रेसच्या सरकारांचा वीट आला असून तिसरी आघाडी स्थापन न झाल्यास जनता आम्हाला माफ करणार नाही. लोकांना तिसरा पर्याय हवा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. तिसर्या आघाडीत नेतृत्वाच्या मुद्यावर मतभेद असल्याचा त्यांनी इन्कार केला. सर्व एकत्र बसून नेतृत्वाबाबत विचार करतील, असे ते म्हणाले.