शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

धक्कादायक...! रामललांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर करण्यात आलं होतं अब्दुलचं 'ब्रेनवॉश', अशी होती मंदिरावर हल्ला करण्याची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 12:05 IST

दोन हँड ग्रेनेड देऊन त्याला मंदिरावर हल्ला करण्यासाठी पाठवले होते. मात्र, यापूर्वीच फरीदाबाद स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) आणि गुजरात दहशतवादविरोधी पथकाने त्याला अटक केली...

फरीदाबादमधील पाली येथून अटक करण्यात आलेल्या संशयित दहशतवादी अब्दुल रहमानला राम मंदिरावर हल्ला करण्याचे टार्गेट देण्यात आले होते. महत्वाचे म्हणजे, १९ वर्षीय अब्दुल हा उत्तर प्रदेशातील फैजाबाद (अयोध्या) येथील रहिवासी आहे. तो या हल्ल्यासाठी पूर्णपणे तयार होता. त्याचे ब्रेनवॉश करण्यात आले होते. काही महिने त्याला प्रशिक्षणही देण्यात आले होते. यानंतर आता दोन हँड ग्रेनेड देऊन त्याला मंदिरावर हल्ला करण्यासाठी पाठवले होते. मात्र, यापूर्वीच फरीदाबाद स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) आणि गुजरात दहशतवादविरोधी पथकाने त्याला अटक केली.

चौकशीत या महत्वाच्या गोष्टींचा खुलासा - चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार, रामललाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर, मंदिरावर दहशतवादी हल्ला करण्यासाठी त्याचे  ब्रेनवॉश करण्यात आले होते. अयोध्येतील मिल्कीपूर येथे दुकान चालवणारा अब्दुल रहमान हा बऱ्याच दिवसांपासून राम मंदिरची रेकी करत होता. एवढेच नाही तर, राम मंदिर उडविण्याचा कट दहशतवाद्यांनी रचला होता, असा खुलासाही त्याने केला आहे.

आयएसच्या इस्लामिक स्टेट खुरासान मॉड्यूलसी संबंधित अब्दुल रहमान हा नाव बदलून मोठा कट रचत होता. त्याने व्हिडिओ कॉलच्या माध्यमाने ट्रेनिंग घेतली होती. तो दिल्लीतील निजामुद्दीन मरकजमध्येही गोला होता. आता, या काळात तो कुणाकुणाला भेटला, यासंदर्भात यंत्रणा तपास करत आहेत. 

मोबाईलमध्ये अनेक धार्मिक स्थळांचे व्हडिओ आणि फोटो -अब्दुलच्या निशाण्यावर केवळ राम मंदिरच नव्हे, तर इतर काही धार्मिक स्थळेही होती. त्याच्या मोबाईलमध्ये काही धार्मिक स्थळांचे फटो आणि व्हिडिओदेखील मिळाले आहेत. यासंदर्भातही त्याची कसून चौकशी सुरू आहे.

राम मंदिर आणि परिसराचे फुटेजही तपासले जातायत - माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहिती नुसार, सुरक्षा एजन्सी राम मंदिर आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेजही तपासणार आहेत. राम मंदिराच्या रेकी शिवाय अब्दुल कुठे कुठे गेला आणि त्याच्यासोबत कोण कोण होते, हे याचीही चौकशी केली जात आहे. गुजरात एटीएस आणि पलवल एसटीएफ या प्रकरणाचा तपास करत आहेत.  

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याTerrorismदहशतवाद