अब्दुल कलाम यांचे वैजानिक सल्लागार राजकारणात
By Admin | Updated: February 28, 2016 10:32 IST2016-02-28T09:34:18+5:302016-02-28T10:32:46+5:30
भारताचे दिवगंत राष्ट्रपती आणि प्रसिध्द वैज्ञानिक अब्दुल कलाम यांचे वैज्ञानिक सल्लागार व्ही.पोनराज राजकारणात प्रवेश करणार आहेत.

अब्दुल कलाम यांचे वैजानिक सल्लागार राजकारणात
ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. २८ - भारताचे दिवंगत राष्ट्रपती आणि प्रसिध्द वैज्ञानिक अब्दुल कलाम यांचे वैज्ञानिक सल्लागार व्ही.पोनराज राजकारणात प्रवेश करणार आहेत. पोनराज यांनी शनिवारी राजकारणात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले.
रविवारी रामेश्वरम येथे अब्दुल कलाम स्मारकाचे दर्शन घेतल्यानंतर ते त्यांची पुढील राजकीय वाटचाल, राजकीय पक्षाचे नाव जाहीर करणार आहेत. अब्दुल कलाम यांना अभिप्रेत असलेले तामिळनाडू घडवूया असे त्यांनी तामिळनाडूच्या जनतेला आवाहन केले आहे.
युवकांच्या संम्मेलनाला संबोधित करताना पोनराज यांनी राजकारणात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली. पोनराज यांच्या राजकारण प्रवेशाचे समर्थन करण्यासाठी विविध जिल्ह्यातून युवक मोठया संख्येने आले होते. बदलासाठी नव्हे तर, तामिळनाडूचे विकसित राज्यामध्ये परिवर्तन करण्यासाठी राजकारणात प्रवेश करत असल्याचे पोनराज यांनी सांगितले.