घंटागाडी कर्मचार्‍यांना चोरी करताना पकडले

By Admin | Updated: February 13, 2015 23:11 IST2015-02-13T23:11:16+5:302015-02-13T23:11:16+5:30

सिडको : अंबड औद्योगिक वसाहतीतील कारखान्यातून लोखंडी साहित्याची चोरी करणार्‍या दोघा घंटागाडी कर्मचार्‍यांना कंपनी मालकाने रंगेहाथ पकडले. भरदिवसा चोरी करण्याचा प्रयत्न करणार्‍या या मद्यधुंद कर्मचार्‍यांना अंबड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

The abattoir caught the employees while stealing | घंटागाडी कर्मचार्‍यांना चोरी करताना पकडले

घंटागाडी कर्मचार्‍यांना चोरी करताना पकडले

डको : अंबड औद्योगिक वसाहतीतील कारखान्यातून लोखंडी साहित्याची चोरी करणार्‍या दोघा घंटागाडी कर्मचार्‍यांना कंपनी मालकाने रंगेहाथ पकडले. भरदिवसा चोरी करण्याचा प्रयत्न करणार्‍या या मद्यधुंद कर्मचार्‍यांना अंबड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
अंबड औद्योगिक वसाहतीत आयमा हाऊसजवळ आयमाचे उपाध्यक्ष वरुण तलवार यांची टाल्को इंडिया नावाची कंपनी आहे. शुक्रवारी सायंकाळी सिडको भागातील घंटागाडी चालकांनी त्यांच्याकडील घंटागाडी क्रमांक एमएच-१५/एबी-४१५१ मध्ये कारखान्यातील सुमारे दीडशे किलो वजनाचे लोखंडी साहित्य चोरी करून घंटागाडीत टाकत होते. याचवेळी कारखान्यातील एका कामगाराने आपले मालक तलवार यांना याबाबतची माहिती दिली. त्यांनी तत्काळ घंटागाडीवरील दोन कर्मचार्‍यांना ताब्यात घेतले. घटनेनंतर प्रभाग सभापती उत्तम दोंदे, राधाकृष्ण नाईकवाडे हेदेखील घटनास्थळी आले. दोंदे यांनी अंबड पोलिसांना याबाबतची माहिती दिली. या दोघा घंटागाडी कर्मचार्‍यांना अंबड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

Web Title: The abattoir caught the employees while stealing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.