शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

"अबकी बार ४०० पार, तिसरी बार मोदी सरकार"! भाजपचा नारा; भाविकांना अयोध्येला नेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 08:09 IST

भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बैठक झाली. सर्व राज्यांचे राज्यनिहाय मूल्यांकन करून स्थानिक पातळीवर युती करणे किंवा छोट्या प्रादेशिक पक्षांशी समन्वय साधण्याची चर्चाही झाली. 

संजय शर्मा -

नवी दिल्ली : २०२४च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजप ‘अबकी बार ४०० पार, तिसरी बार मोदी सरकार’ या घोषणेसह मैदानात उतरणार आहे. त्यासाठी सर्व लोकसभा जागांवर विधानसभानिहाय समन्वयक आणि प्रभारी नियुक्त केले जातील. बूथ मॅनेजमेंटपासून नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी व भाजपमध्ये नवीन लोकांचा समावेश करण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी समित्या स्थापन केल्या जाणार आहेत. 

भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बैठक झाली. सर्व राज्यांचे राज्यनिहाय मूल्यांकन करून स्थानिक पातळीवर युती करणे किंवा छोट्या प्रादेशिक पक्षांशी समन्वय साधण्याची चर्चाही झाली. 

जे. पी. नड्डा यांच्याशिवाय केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव, मनसुख मांडविया, मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुघ, सुनील बन्सल, विनोद तावडे, दुष्यंत गौतम हेही या बैठकीत उपस्थित होते. 

४३० शहरांमधून ३५ विशेष रेल्वे  -- २२ जानेवारीला भाजप देशभरात दिवाळी साजरी करणार आहे. भाजप कार्यकर्ते या दिवाळी कार्यक्रमाचे आयोजन करतील. - भाजप देशभरात घरोघरी जाऊन राम मंदिराच्या पुस्तिकांचे वाटप करणार आहे. अयोध्या राम मंदिरासाठी भाजप आणि आरएसएसने आतापर्यंत केलेल्या संघर्षाचे चित्रण या पुस्तकात केले आहे. - २५ जानेवारी ते २५ मार्च दरम्यान इच्छुकांना राम मंदिराच्या दर्शनासाठी नेण्याची जबाबदारी भाजप कार्यकर्ते उचलणार आहेत. त्यासाठी ४३० शहरांमधून अयोध्येसाठी ३५ रेल्वे चालवणार आहेत.

 

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक