आबा.....मंत्री खासदार

By Admin | Updated: February 16, 2015 23:55 IST2015-02-16T23:55:21+5:302015-02-16T23:55:21+5:30

ग्रामीण नेतृत्व हरपले - चंद्रशेखर बावनकुळे

Aba ..... Minister of the MP | आबा.....मंत्री खासदार

आबा.....मंत्री खासदार

रामीण नेतृत्व हरपले - चंद्रशेखर बावनकुळे
ग्रामीण भागातून उदयास आलेले नेतृत्व हरपले. त्यांच्या निधनाने आपण एक उत्तम वक्ता, प्रभावीपणे सभागृहात प्रश्न मांडणारा नेता गमावला. तळागाळातील जनतेशी इमान राखणारा नेता आपल्यातून निघून गेला. त्याचे दु:ख आहे.
- चंद्रशेखर बावनकुळे,
ऊर्जा तथा पालकमंत्री.
....
महाराष्ट्र पोरका झाला - कृपाल तुमाने
अत्यंत साधे व्यक्तिमत्त्व, सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण, त्याबद्दल कळकळ असणारा नेता म्हणून अवघ्या महाराष्ट्राला ते परिचित होते. प्रत्येक विषयाबद्दल त्यांचा प्रचंड अभ्यास होता. त्यांच्या अचानक जाण्याने महाराष्ट्र पोरका झाला आहे.
- कृपाल तुमाने,
खासदार, रामटेक.
.....

Web Title: Aba ..... Minister of the MP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.