आहिरेच्या सरपंचपदी बाळू आहेरकर
By Admin | Updated: August 27, 2015 23:45 IST2015-08-27T23:45:11+5:302015-08-27T23:45:11+5:30
पाईट : आहिरेच्या सरपंचपदी भाजप-सेना पुरस्कृत अंबिका विकास पॅनलचे बाळू आहेरकर यांची ५ विरूध्द २ मतांनी, तर उपसरपंचपदी उषा तांबे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीमुळे आहिरे ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाले.

आहिरेच्या सरपंचपदी बाळू आहेरकर
प ईट : आहिरेच्या सरपंचपदी भाजप-सेना पुरस्कृत अंबिका विकास पॅनलचे बाळू आहेरकर यांची ५ विरूध्द २ मतांनी, तर उपसरपंचपदी उषा तांबे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीमुळे आहिरे ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाले.सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी दोन उमेदवारी अर्ज आल्याने या पदासाठी निवडणुक घ्यावी लागली. सरपंच पदासाठी अनुक्रमे बाळू आहेरकर व शांता आहेरकर यांचे अर्ज आल्याने मतदान घ्यावे लागले. यामध्ये बाळू आहेरकर यांची ५ विरूध्द २ मतांनी निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी एम. जी. पाटोळे यांनी जाहीर केले, तर उपसरपंच पदासाठी फक्त उषा बाळू आहेरकर यांचाच अर्ज आल्याने उपसरपंचपदी त्यांची बिनविरोध निवड झाली.या वेळी सविता आहेरकर, सुरेश कोयते, पल्लवी कहाणे, आशा साळवे हे सदस्य उपस्थित होते.निवडणूक यशस्वी करण्यासाठी अंबिका पॅनलचे विमल आहेरकर, नारायण आहेरकर, हिरामण आहेरकर, सबाजी कोयते, कैलास तांबे, अंकुश तांबे, किसन आहेरकर, सुभाष आहेरकर, शांताराम कहाणे, चिंधु आहेरकर यांनी प्रयत्न केले.फोटो : आहिरे येथील सरपंचपदी बाळू आहेरकर यांची व उपसरपंचपदी उषा तांबे यांची निवड झाल्यावर अभिवादन करताना मान्यवर.