शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अरे व्वा! HR ची चांगली नोकरी सोडली अन् सुरू केला स्वतःचा व्यवसाय; दरमहा 40 लाखांची उलाढाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 18:01 IST

तरुणाने मल्टीनॅशनल कंपनीतील एचआरची नोकरी सोडून 2015 मध्ये हरितिमा फूड नावाचा नवीन व्यवसाय सुरू केला. 

दिल्लीतील प्रगती मैदानावर आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याचे आयोजित केला जात आहे. यामध्ये देश-विदेशातून अनेक लोक आले आहेत ज्यांनी आपल्या स्टार्टअपमध्ये यश मिळवलं आहे. यामध्ये मध्य प्रदेशच्या अरेन रत्नेश सोरठिया याचाही समावेश आहे. या तरुणाने मल्टीनॅशनल कंपनीतील एचआरची नोकरी सोडून 2015 मध्ये हरितिमा फूड नावाचा नवीन व्यवसाय सुरू केला. 

कठोर परिश्रम आणि जिद्दीने त्याने आपला चहा देशभर वितरीत केला आहे आणि आता दरवर्षी कोट्यवधींचा व्यवसाय करत आहे. अरेन रत्नेश सोरठियाने सांगितलं की, चहाचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी तो मल्टीनॅशनल कंपनीत एचआर म्हणून काम करत होता, परंतु त्याला कामाचा आनंद मिळत नव्हता. 

"मला चहा खूप आवडतो. नोकरी सोडून काहीतरी वेगळं करण्याचा विचार मनात आला. मग मी दार्जिलिंगला जाऊन चहावरच शिक्षण घेतलं आणि त्यानंतर हरितिमा फूड प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडसोबत माझा स्टार्टअप सुरू केला आणि आज आम्ही लोकांना साधा चहा नाही तर फ्लेवरवाला चहा आणि कॉफी देत ​​आहोत."

17 फ्लेवर्सचा चहा 

"आम्ही आमचा व्यवसाय फक्त एका उत्पादनाने सुरू केला. आज आमच्याकडे एकूण 66 उत्पादनं आहेत. आमच्या चहामध्ये रोझ, मसाला, लेमन यासह 17 फ्लेवर्स आहेत. तर कॉफीमध्ये देखील 10 पेक्षा जास्त फ्लेवर्स आहेत. आज आम्ही भारतातील सर्व राज्यांमध्ये आमची उत्पादनं विकतो."

दरमहा 30-40 लाखांची उलाढाल

"सुरुवातीच्या टप्प्यात लॉकडाऊनमुळे चहाचं एक पाकीटही विकलं गेलं नाही, पण कोरोना संपताच आमची चहाची विक्री वाढली आणि आज आम्ही आमचा चहा आणि कॉफी 10,000 हून अधिक कॅफेमध्ये विकतो. आमचे 30 ते 40 लाख रुपये वर्षाला फक्त पगार देण्यावरच खर्च होतात. तर महिन्याची उलाढाल 30 ते 40 लाख रुपये आहे" असंही अरेनने म्हटलं आहे. news18 हिंदीने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी