शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
2
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
3
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
4
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
5
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
6
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
7
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
8
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
9
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
10
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
11
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
12
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
13
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक
14
Viral Video: भल्यामोठ्या अजगराला दुचाकीला बांधून फरफटत नेलं, संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड!
15
वानखेडे स्टेडियममध्ये सुनील गावसकर, शरद पवार यांचा होणार गौरव, MCA उभारणार पुतळा
16
जुहूच्या समुद्रात दोन अल्पवयीन मुले बुडाली; एकाला वाचवलं, दुसऱ्याचा शोध सुरू!
17
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
18
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
19
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
20
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद

"तीराप्रमाणेच आमचा आरवही व्हेंटिलेटरवर, त्याच्या आईला ब्लड कॅन्सर; आम्हालाही मदत मिळेल का?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 08:45 IST

तीराप्रमाणेच आरवलादेखील आर्थिक मदत हवीय. त्यासाठी त्याच्या कुटुंबानं आवाहन केलंय.

स्पायनल मस्क्युलर अॅट्रोफी टाईप-१ या दुर्धर आजाराचा सामना करणाऱ्या चिमुकल्या तीरा कामतला नवजीवन मिळणार आहे. सोशल मीडियातून पुढे आलेले अनेक दात्यांचे हात, त्यानंतर सरकारनं परदेशातून आणाव्या लागणाऱ्या इंजेक्शनवरील कर माफ केल्यानं तीराच्या कुटुंबाला मोठा आधार मिळाला. मात्र देशात तीरासारखीच आणखीही काही बालकं आहेत. त्या लहानग्या जीवांना वाचवण्यासाठी लोकांच्या, सरकारच्या मदतीची गरज आहे.दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात उपचार घेत असलेला चिमुकला आरवदेखील तीराप्रमाणेच स्पायनल मस्क्युलर अॅट्रोफी टाईप-१ SMA Type-1 आजाराशी झुंज देत आहे. तो सध्या आयसीयूमध्ये आहे. हा आजार मज्जातंतूंशी संबंधित आहे. यामध्ये मज्जातंतू हळूहळू मरू लागतात आणि मेंदूकडून स्नायूंना जाणारे सिग्नल मंदावत जातात. त्यामुळे स्नायूंवरही नियंत्रण राहत नाही. तज्ज्ञांच्या मते, जनुकीय बदलांमुळे होणारा आजार आहे. चिमुकल्या तीरा कामतचं १६ कोटींचं इंजेक्शन दोन आठवड्यात मुंबईत; सरकारकडून ५ कोटींचा दिलासाआरव एसएमए टाईप-१ आजाराचा सामना करत असताना त्याची आई पूजाला ब्लड कॅन्सर झाला. त्यांच्यावरही सध्या उपचार सुरू आहेत. त्यामुळे कुटुंबावर संकटांचा डोंगर कोसळला. आरवचे बाबा यामुळे खूप खचले आहेत. ते कोणाशीही बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यामुळे सगळी धावपळ, पैसे जमा करण्याचे प्रयत्न आरवचे मामा अंकुर कुमार करत आहेत. 'बीबीसी मराठी'नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.अंकुर कुमार आणि त्यांच्या कुटुंबानं, निकटवर्तीयांनी गेल्या काही महिन्यांत प्रचंड भोगलं आहे. त्यांची व्यथा ऐकून डोळ्यात अक्षरश: पाणी येतं. 'आरव फक्त आठ महिन्यांचा आहे. या आठ महिन्यांता फक्त दोन-तीनदा माय-लेकराची भेट झाली. माझ्या बहिणीला आतापर्यंत साधी सर्दीची गोळीही घ्यावी लागली नव्हती आणि आता ती ल्युकेमियानं ग्रस्त आहे. आम्ही सगळे त्या काळजीत असताना आरवला एसएमए टाईप-१ आजाराचं निदान झालं.' अंकुर यांच्या बोलण्यातून हतबलता जाणवते.तीराच्या इंजेक्शनसाठी १६ कोटी रुपये जमले; आता हवी मोदी-ठाकरे सरकारची मदतएसएमए टाईप-१ आजारावर भारतात उपचार नाहीत. त्यासाठी लागणारी औषधं अमेरिकेहून मागवावी लागतात. इंजेक्शनची किंमत १६ कोटींच्या घरात आहे. त्यावर भारत सरकार ६ कोटींचा कर लावतं. तीरा कामतच्या बाबतीत केंद्र सरकारनं हा कर माफ केला. तशीच मदत आपल्यालाही मिळावी, अशी अंकुर यांची अपेक्षा आहे. 'एवढ्या मोठ्या देशाचं भक्कम सरकार आहे, ते आम्हाला मदत करू शकतं. सत्ताधाऱ्यांनी मनावर घेतलं तर फक्त एका तीराला नाही, तिच्यासारख्या अनेकांना जीवदान मिळेल. सरकारला सगळी बालकं सारखीच,' असं बोलत असताना अंकुर त्यांच्या मनात असलेली अपेक्षा बोलून दाखवतात.