‘आप’ची लोकप्रियता पाच महिन्यांत घसरली
By Admin | Updated: May 17, 2014 03:18 IST2014-05-17T03:18:48+5:302014-05-17T03:18:48+5:30
पाच महिन्यांपूर्वी लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या आम आदमी पक्षाला (आप) अचानक ग्रहण लागले आहे.

‘आप’ची लोकप्रियता पाच महिन्यांत घसरली
नवी दिल्ली : पाच महिन्यांपूर्वी लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या आम आदमी पक्षाला (आप) अचानक ग्रहण लागले आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेसला झटका देणार्या ‘आप’ला लोकसभेत केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले आहे. ‘आप’ने देशभरात ४३५ उमेदवार मैदानात उतरवले होते. त्यापैकी केवळ पंजाबमध्ये त्यांना विजय मिळाला आहे. दिल्ली विधानसभेत स्पष्ट बहुमतापासून अगदी काही पावलावर असलेला ‘आप’ राजधानीत लोकसभेची एकही जागा जिंकू शकला नाही. पण सातही जागांवर काँग्रेसला तिसर्या क्रमांकावर फेकले.