दिल्लीचे राज्यपाल जंग यांच्यावर ‘आप’चा हल्लाबोल

By Admin | Updated: September 1, 2014 00:10 IST2014-09-01T00:10:43+5:302014-09-01T00:10:43+5:30

दिल्लीत सरकार स्थापनेबाबत नायब राज्यपाल नजीब जंग राष्ट्रपतींना पत्र लिहिणार असल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर आपने जंग भाजपाचे काम करीत असल्याचा हल्लाबोल केला.

AAP's attack on Delhi's Governor Jung | दिल्लीचे राज्यपाल जंग यांच्यावर ‘आप’चा हल्लाबोल

दिल्लीचे राज्यपाल जंग यांच्यावर ‘आप’चा हल्लाबोल

नवी दिल्ली : दिल्लीत सरकार स्थापनेबाबत नायब राज्यपाल नजीब जंग राष्ट्रपतींना पत्र लिहिणार असल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर आपने जंग भाजपाचे काम करीत असल्याचा हल्लाबोल केला.
नायब राज्यपाल नव्हे तर भाजपा अध्यक्ष अमित शहा निर्णय घेत आहेत. हे दिल्लीत शासन करीत असलेले केंद्र आहे, असे पक्षाचे वरिष्ठ नेता मनीष सिसोदिया म्हणाले. निवडणुका घेण्यात आल्यास कामे आणि इतर विकास उपक्रम दोन महिन्यांपर्यंत ठप्प होतील, या नायब राज्यपालांच्या मताबद्दल सिसोदिया यांनी टीका केली. एकीकडे जनता त्रस्त आहे, असे म्हणता. मग आठ महिन्यांपासून विना सरकार राहण्यापेक्षा दोन महिने काम थांबणे केव्हाही चांगले, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)

Web Title: AAP's attack on Delhi's Governor Jung