शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

आपने जिंकल्या विधानसभेच्या २ जागा; भाजपने लावली होती ताकद पणाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 08:56 IST

पोटनिवडणूक : भाजप, तृणमूल, काँग्रेसने राखली प्रत्येकी एक जागा

- हरीश गुप्ता, नवी दिल्ली आम आदमी पक्षाने (आप) विधानसभेच्या पोटनिवडणुकांमध्ये ५ जागांपैकी २ (पंजाब व गुजरात) जागा जिंकून मोठा विजय मिळविला आहे. भाजपने सर्व पाच जागांवर उमेदवार उभे केले होते. मात्र, फक्त गुजरातमधील काडी विधानसभा मतदारसंघातच भाजप उमेदवार राजेंद्र चावडा ३९ हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले.

भाजपने विसावदर मतदारसंघ जिंकण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली होती. येथे आपचे आमदार भूपेंद्र भयानी निवडून आले होते. त्यांनी राजीनामा देत २०२३ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. येथे आपचे माजी प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया यांनी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष किरीट पटेल यांचा १७ हजार मतांनी पराभव केला.

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने कालिगंज मतदारसंघात पुन्हा विजय मिळविला. केरळमध्ये काँग्रेसने निलांबूरची जागा जिंकली. ही जागा वायनाड लोकसभा मतदारसंघात येते. येथे काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी खासदार आहेत. त्यांनी या पोटनिवडणुकीत स्वतः प्रचार केला होता. येथे डावे पराभूत झाले.

राज्यसभेवर जाणार नाही

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपण राज्यसभेवर जाण्यास इच्छुक नसल्याचे म्हटले आहे. आपचे राज्यसभा सदस्य संजीव अरोरा यांनी लुधियाना पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर आता राज्यसभेची ही जागा रिक्त होत आहे.

या जागेवर कुणाला उमेदवारी द्यायची हे पक्षाची राजकीय निर्णय घेणारी समिती निश्चित करेल, असे केजरीवाल म्हणाले. दिल्लीत आपच्या विरोधकांनी केजरीवाल आता राज्यसभेत अरोरा यांच्या जागी निवडून जातील, असा कयास मांडला होता.

टॅग्स :Electionनिवडणूक 2024AAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपाGujaratगुजरात