शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सर्वेक्षण : दिल्ली विधानसभेत 50 % मतांसह 'आप' नं 1 तर भाजपाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2020 20:12 IST

दिल्लीत विधानसभा निवडणुकांसाठी अंदाजे 53 टक्के मतदान झाले आहे.

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडलं असून दिल्लीत 53 टक्के मतदान झालंय. मतदानानंतर काही वेळातच माध्यमांचे एक्सिट पोल हाती आला आहे. दिल्लीत पुन्हा एकदा केजरीवाल सरकार सत्तेत येणार असल्याचे स्पष्ट संकेत एबीपी न्यूज आणि सी व्होटरच्या एक्झिट पोलमधून मिळाले आहेत. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांपैकी आम आदमी पक्षाला 49-63 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दिल्लीत विधानसभा निवडणुकांसाठी अंदाजे 53 टक्के मतदान झाले आहे. त्यापैकी, केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला सर्वाधिक मतदान मिळालंय. दिल्लीत आपला 49 ते 63 जागा मिळतील, असा सर्वेक्षण अंदाज आहे. भाजपाला दिल्लीत 5 ते 19 जागा मिळण्याची शक्यता आहे. तसेच गेल्या वेळी भोपळाही फोडता न आलेल्या काँग्रेसला यंदा 4 जागा मिळणार असल्याचं सूतोवाच करण्यात आलं आहे.  एबीपी न्यूज आणि सी व्होटरच्या एक्झिट पोलमधून जागांसह कोणत्या पक्षाला किती टक्के मतदान? मिळणार हेही सांगण्यात आलंय. त्यानुसार, झालेल्या मतदानाच्या टक्केवारीपैकी 50.04 टक्के मतदान केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला मिळणार आहे. तर, भाजपाला 36 टक्के मते मिळतील, असा सर्वेक्षण अंदाज आहे. या सर्वेक्षणानुसार काँग्रेसला 09 टक्के तर इतर पक्षांना 02.06 टक्के मते मिळतील असा अंदाज आहे.  

आम आदमी पार्टी : 50.04%भाजप : 36%काँग्रेस : 09%इतर : 02.06%

दरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, तसेच गोपाल राय व आतिशी (सर्व आप), भाजपाचे आशीष सूद, तेजिंदरपाल बग्गा, विजेंदर गुप्ता आणि अरविंदरसिंह लवली, कृष्णा तीरथ, अलका लांबा हे महत्त्वाचे नेते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ही निवडणूक आम आदमी पक्षासाठी अटीतटीची, भारतीय जनता पक्षासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नेतृत्व कसोटी पाहणारी, तर काँग्रेससाठी अस्तित्वाची लढाई आहे. निवडणूक प्रचारात स्थानिक ते राष्ट्रीय मुद्दे प्रचारात गाजले होते. अनेक आयाराम-गयारामही यंदा रिंगणात उतरले आहे. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल काय लागतो हे 11 फेब्रुवारीला मतमोजणीनंतरच समजणार आहे.

टॅग्स :AAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपाMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र