शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

"दिल्ली जगातील सर्वात असुरक्षित राजधानी", अरविंद केजरीवालांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 13:52 IST

Arvind Kejriwal : केंद्र सरकार आणि गृहमंत्री अमित शाह हे दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरले आहेत, असेही अरविंद केजरीवाल म्हणाले.

नवी दिल्ली : दिल्ली ही जगातील सर्वात असुरक्षित राजधानी असल्याचे आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal)  यांनी गुरुवारी (दि.२८) म्हटले आहे. तसेच, केंद्र सरकार आणि गृहमंत्री अमित शाह हे दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरले आहेत, असेही अरविंद केजरीवाल म्हणाले. यावेळी त्यांनी एक नकाशा दाखवला. ज्यामध्ये अमित शाहांच्या निवासस्थानापासून काही किलोमीटर परिसरात अलीकडच्या काळात किती गुन्हेगारी घटना घडल्या आहेत, हे नकाशाद्वारे दाखवण्याचा प्रयत्न केला.

आज मला जड अंतःकरणाने ही पत्रकार परिषद घ्यावी लागत आहे. दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे. मुंबईसारखे गँगवार दिसत आहे. आज दिल्ली ही जगातील सर्वात असुरक्षित राजधानी आहे. गेल्या तीन महिन्यांत यमुनेच्या पलीकडे झालेल्या गँगवॉरमध्ये २० जणांना आपला जीव गमवावा लागला, असे अरविंद केजरीवाल म्हणाले. तसेच, दहा वर्षांपूर्वी मला एक जिम्मेदारी मिळाली. त्यावेळी शाळा, वीज, आरोग्य, पाणी या सर्व गोष्टी मी व्यवस्थित केल्या. पाण्याची स्थिती सुधारत आहे. मात्र, दिल्लीतील सुरक्षेची जबाबदारी केंद्राची आहे, असे म्हणत अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी अमित शाह यांची आहे. अमित शाह दहा वर्षात कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यात अपयशी ठरले आहेत. दिल्लीला रेप कॅपिटल, गँगस्टर कॅपिटल म्हटले जात आहे. आज महिला आणि व्यावसायिक सर्वाधिक घाबरले आहेत, असे अरविंद केजरीवाल म्हणाले. तसेच, त्यांनी सांगितले की, काल मी एका व्यावसायिकाला भेटायला नांगलोईला गेलो होतो, ज्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. मी फक्त भेटायला गेलो होतो, पण भाजपचे खासदार आपल्या लोकांसह तिथे पोहोचले आणि मला रोखण्याचा प्रयत्न केला. पण, मला रोखून काही होणार नाही.

पुढे अरविंद केजरीवाल म्हणाले, गेल्या एका वर्षात १६० खंडणीचे कॉल आले आहेत. तसेच, असे कितीतरी कॉल असतील, जे लोक सांगत नाहीत. एका व्यावसायिकाला परदेशी नंबरवरून खंडणीचा कॉल येतो आणि त्याने पैसे दिले नाही तर त्याला गोळ्या घातल्या जातील असे सांगितले जाते, जेणेकरून व्यावसायिकाने भीतीपोटी पैसे द्यावे. आज दिल्लीत व्यवसाय करणे हा गुन्हा ठरत आहे. या सर्व घटना अमित शाह यांच्या घरापासून काही किलोमीटर अंतरावर घडत आहे. जर अमित शहा आपल्या घराची २० किमीचा परिसर सुरक्षित ठेवू शकत नसतील तर ते देश कसा सुरक्षित ठेवणार? असा सवाल अरविंद केजरीवाल यांनी केली.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhi capitalsदिल्ली कॅपिटल्सdelhiदिल्लीAAPआपAmit Shahअमित शाह