“आम्ही ‘आप’ सैनिक, मरण पत्करु पण घाबरणार नाही”; अटकेनंतर संजय सिंह यांचा भाजपवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 08:24 PM2023-10-04T20:24:19+5:302023-10-04T20:26:29+5:30

AAP MP Sanjay Singh: हे भाजपच्या निराशेचे लक्षण आहे. वाईटरित्या पराभव निश्चित आहे, या शब्दांत संजय सिंह यांनी हल्लाबोल केला.

aap mp sanjay singh first reaction and criticised bjp after ed arrest in liquor scam case | “आम्ही ‘आप’ सैनिक, मरण पत्करु पण घाबरणार नाही”; अटकेनंतर संजय सिंह यांचा भाजपवर घणाघात

“आम्ही ‘आप’ सैनिक, मरण पत्करु पण घाबरणार नाही”; अटकेनंतर संजय सिंह यांचा भाजपवर घणाघात

googlenewsNext

AAP MP Sanjay Singh: अचानक ईडी माझ्या घरी पोहोचली. दिवसभर छापेमारी केली. पण काहीही निष्पन्न झाले नाही. आता बळजबरीने अटक केली जात आहे. आम्ही आम आदमी पार्टीचे सैनिक आहोत. नरेंद्र मोदी यांना सांगू इच्छितो की, निवडणुकीत तुमचा वाईटरित्या पराभव होणार आहे. हे तुमच्या निराशेचे आणि पराभवाचे लक्षण आहे. जेव्हा जेव्हा अत्याचार वाढतात, तेव्हा त्याविरोधात जनतेकडून आवाज उठवला जातो. आम्ही प्रसंगी मरण पत्करू पण घाबरणार नाही, या शब्दांत आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ED ने आम संजय सिंह यांना अटक केली. बुधवार सकाळपासून ईडीने सिंजय सिंह यांच्या निवासस्थानी छापेमारी करत तपासणी सुरू केली होती. अखेर सायंकाळी संजय सिंह यांना अटक करण्यात आली. अटकेनंतर संजय सिंह यांनी एक व्हिडिओ जारी करत भाजपवर घणाघाती टीका केली आहे. 

याआधीही आवाज उठवला, यापुढेही आवाज उठवणार

संजय सिंह पुढे म्हणाले की, याआधीही आवाज उठवला, यापुढेही आवाज उठवणार. दुसरीकडे, माझा मुलगा निर्दोष आहे. तो सत्यासाठी लढत आहे. त्याला चुकीच्या पद्धतीने गोवण्यात आले आहे. मला आशा आहे की, तो लवकरच या सगळ्यातून बाहेर पडेल, अशी प्रतिक्रिया संजय सिंह यांच्या आईने दिली. तसेच ज्याला आईचा आशीर्वाद असतो, त्याला कोणीही नुकसान करू शकत नाही. प्रत्येक क्रांतिकारकाला तुरुंग पाहावा लागतो. आता संजय सिंह यांना हा बहुमान मिळाला आहे. ते घाबरले नाहीत आणि घाबरणारही नाहीत. अन्यायाविरुद्ध लढत राहणार, असे आम आदमी पार्टीने म्हटले आहे. 

दरम्यान, संजय सिंह यांची अटक पूर्णपणे बेकायदेशीर आहे. यावरून नरेंद्र मोदीजी यांची अस्वस्थता दिसून येते. निवडणुकीपर्यंत ते आणखी अनेक विरोधी नेत्यांना अटक करतील, असा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला. 


 

Web Title: aap mp sanjay singh first reaction and criticised bjp after ed arrest in liquor scam case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.